
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कालच मोठी वाढ झाली. दहाव्या दिवसातील ही चाैथी वाढ होती. त्यानंतर आता असून एक मोठा दणका देत थेट सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. थेट 2 रूपयांनी ही वाढ करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा आहे. यासोबतच सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या कितमी वाढवण्यात आला. त्यानंतर आज थेट सीएनजीच्या कितमीत वाढ करण्यात आली. एकेकाळी स्वस्त आणि परवडणारे इंधन मानल्या जाणाऱ्या सीएनजीच्या किमतीही सातत्याने वाढत आहे. मंगळवार 26 मे 2026 रोजी गॅस वितरण कंपन्यांनी ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का दिला.
दिल्लीत सीएनजीच्या दरात थेट 2 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरामुळे आता सीएनजीचा नवीन भाव 83.09 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. मुळात म्हणजे ही काही छोटी दरवाढ नाहीये. थेट 2 रुपयांनी भावात वाढ झाली. सलग चाैथी वाढ ही म्हणावी लागणार आहे. सर्वसामान्य लोकांना कुठूनही दिलासा मिळताना दिसत नाहीये.
एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल आणि त्या पाठोपाठच सीएनजीचे दरही वाढत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात महागाईने चांगलाच मोठा कहर गेल्याचे बघायला मिळतंय. जवळपास प्रत्येक गोष्टीचा भाव वाढताना दिसत आहे. सर्वच गोष्टींचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्य लोक अडचणीत आलेत. शिवाय अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा आहे.
इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडीतून भारतीय जहाज काढण्याकरिता प्रयत्न करण्यात आली. होर्मुज खाडीतील परिस्थिती सध्याच सुधारण्याचे संकेत नाहीत. भारतात त्यापूर्वीच या युद्धाचे परिणाम बघायला मिळत आहेत. सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. त्यामध्येच सतत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या भावात वाढ होत आहे.
Leave a Reply