• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ

July 28, 2026 by admin Leave a Comment


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट) प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विद्यार्थ्याच्या वडिलांनी विद्यापीठातील एका अधिकाऱ्याला 70 हजार रुपये दिल्याचा आरोप समोर आला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी वाडिया महाविद्यालयाचे पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यापीठातील अधिकाऱ्याला 70 हजार रुपये दिल्याचा दावा केला आहे. या व्यवहारानंतर प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत संशय निर्माण झाल्याने प्रकरण समोर आले.

या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने तातडीने दखल घेत सत्यशोधन समितीची स्थापना केली आहे. समिती संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणार असून, त्यानंतर सविस्तर अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरूंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवालाच्या आधारे आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. या कथित बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, चौकशी अहवालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in