• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोटेगावकरनंतर आता नवा डॉक्टर रडारवर, नीट प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; धक्कादायक माहिती समोर!

May 22, 2026 by admin Leave a Comment


Neet Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे केला जात आहे. सध्या लातूरमधील आरसीसी क्लासेसचा प्रमुख मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आहे. मोटेगावकरच्या अटकेनंतर नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोर लातूरपासून ते अंबाजोगाईपर्यंत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सीबीआयच्या तपासाला वेग आला असून लातूरमधीलच डॉ मनोज शिरूरे याच्यानंतर आता आणखी एका डॉक्टरच्या घरी कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत सीबीआयच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी एक डॉक्टर चौकशीसाठी ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार लातूरमध्ये सीबीआयने ताब्यात घेतलेल्या डॉ.मनोज शिरुरे याचे हॉस्पिटल, घर आणि घरा शेजारच्या एका अपार्टमेंटमध्ये चार तास कसून चौकशी केली आहे. या दरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले आहेत. अंबाजोगाईमध्ये दोन विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे पथक थेट लातूरमध्ये डॉ मनोज शिरूरे याच्या घरी पोहचले होते. शिरुरेनंतर आता या नीट गैरव्यवहार प्रकरणात आणखी एका डॉक्टरला सीबीआय चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा डॉक्टर शिरूरे यांचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. या संशयित डॉक्टरच्या घरी सीबीआयने चौकशी करीत काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे लातूरमधून पी व्ही कुलकर्णी, मोटेगावकर, डॉ मनोज शिरूरे आणि आता आणखी एका डॉक्टरचे नाव पेपर फुटीप्रकरणात समोर आले आहे.

लातूरमध्ये सीबीआयची ये-जा सुरूच

लातूर आणि अंबाजोगाईमध्ये नीट प्रकरणी सीबीआयने याआधीच चौकशी केली आहे. अंबाजोगाई इथं दोन विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली आहे तर लातूरमध्ये दोन डॉक्टरांच्या घरी चौकशी करीत सीबीआयच्या पथकाने माहिती मिळवली आहे. लातूरमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांची ये-जा सुरूच आहे. सीबीआयचे वेगवगेळे अधिकारी तपास करीत आहेत. या तपासात स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या नीट पेपरफुटी प्रकरणात नेमकी कोणती माहिती समोर येणार, हे पाहणे मत्त्वाचे ठरणारे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in