• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मै देशभक्त हूँ… अंधभक्त नही… शिवाजी पार्कातून उद्धव ठाकरेंचा नवा नारा; गावागावात आंदोलन उभारण्याची हाक

July 19, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या वीस दिवसांपासून सोनम वांगचूक यांचं उपोषण सुरू होतं, अखरे उपोषणाच्या 21 व्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर अभिजीत दिपके हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघात केला आहे. त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

मी दिल्लीला जाणार आहे. महाराष्ट्र आज इथे आहे. हे आंदोलन फक्त जंतरमंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात हे गेलं पाहिजे गली गली में शोर है ची घोषणा गावागावात गेली पाहिजे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आजपासून जिथे जिथे असाल, मी देशाला विनंती करतो तुम्हाला जसं झेपेल तसं स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध सुरू करा. सभा करा, मशाल मोर्चा करा. मानवी साखळी करा, मेणबत्या मार्च करा. पण या लोकांना कळलं पाहिजे हा देश यांचं ऐकणारं नाही.

अण्णा हजारेंच्यावेळेला अशा टोप्या होत्या. त्यावर मै अण्णा हूँ असं लिहिलं होतं. तुम्ही लिहा मै देशभक्त हूँ . मी अंधभक्त नाही. मोदींचा अंधभक्त होऊ शकत नाही. आजपासून सुरू करा. देशभक्तांची ताकद या देशात आहे. ती उभी राहू शकते. महाराष्ट्र आणि देश उभा करू शकतो हे त्यांना दाखवून द्या.ही ठिणगी आहे. एक ठिणगी वणवा पेटवायला पुरेसी आहे. ती पडली आहे. सत्ता भ्रष्टांना बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आंदोलनाला सुरुवात करूया, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. या सभेला आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती होती, त्यांनी सुद्धा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
  • ‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की…
  • Explainer : आता नेपाळचं व्हायरल घर, तेव्हा केदारनाथचं मंदीर, महाप्रलयात दोघेही शाबूत कसे? वाचा A टू Z
  • पैशासाठी अशा ठिकाणी जाऊ नका.. अर्चना पूरन सिंह यांना ‘लेटेंट’मध्ये पाहून भडकला प्रसिद्ध कॉमेडिअन
  • या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in