
समय रैना आणि वाद हे जुनं समीकरण आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या पहिल्या सीझनमध्ये झालेले वाद चांगलेच गाजले, समयला तो शो चांगलाच महागात पडला. मात्र ते कमी की काय म्हणून ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ हा दुसरा सीझनही सुरू झाला. त्याच्या नुकत्याच आलेल्या एपिसोडमध्ये काश्मिरी पंडितांवरून केलेलं वक्तव्य समय रैनाला (Samay Raina) भोवलं असून त्यावरूही बरीच टीका झाली. तर आता समय रैना आणि त्याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ हा शो पुन्हा चर्चेत आलाय. कारण एक प्रसिद्ध कॉमेडिअन त्यावर भडकले आहेत. ते कॉमेडिअन म्हणजे सुनील पाल (Sunil Pal) . गेल्या आठवड्यात त्यांनी समय रैनाला फटकारलं होतं, तर यावेळी सुनील पाल संतापलेत ते समयवर नव्हे तर त्याच्या शोमध्ये आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांच्यावर. पण असं झालं तरी काय आणि काय म्हणाले सुनील पाल ? जाणून घेऊया सविस्तर..
खरंतर समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. या शोच्या प्रत्येक भागात नवे पाहुणे येतात, आणि ते समयच्या शोची रंगत वाढवतात. नुकतंच या शोमध्ये ओरी आणि अर्चना पूरन v यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती आल्या होत्या. लोकांनाही तो एपिसोड खूप आवडला. मात्र कॉमेडिअन सुनील पाल यांना हीच गोष्ट खटकली, त्यांना तो एपिसोड बिलकूल आवडला नाही. अर्चना पूरन सिंह यांची या शोमधली उपस्थिती त्यांना रुचली नाही आणि त्याच मुद्यावरून पाल यांनी सुनावलं.
तिथे जाण्याची गरज काय होती ?
सुनील पाल यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी अर्चना पूरण सिंह यांना थेट सुनावलं. ‘ (अर्चना जी) तुमचे जेवढे चाहते आहेत, त्या सगळ्यांना वाईट वाटलं. मी तर म्हणतो तिथे जाण्याची गरजच काय होती?’ असा थेट सवाल सुनील पाल यांनी उपस्थित केला. ‘ तुम्ही इतक्या मोठ्या स्टार आहात. तुमच्याकडे तर सतत कामच काम असते. इकडूनही काम, तिकडूनही काम. इकडूनही पैसे येत आहेत, तिकडूनही पैसे येतात आणि सन्मानाने पैसेही मिळत असतात. कारण तुम्ही कलाकार आहात, महान कलाकार आहात. तुम्हाला प्रणाम. पण तिथे जाऊन तुमचा, तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या पतीच्या कुटुंबाचा अपमान झाला” अशा शब्दांत सुनील पाल यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
View this post on Instagram
पैशांसाठी अशा ठिकाणी जाणं थांबवा
पुढे सुनील पाल पुढे, ‘मॅडम, मला वाटतं परमेश्वराने तुम्हाला खूप पैसा दिला आहे, खूप नाव दिलं आहे. आता तुम्ही ठरवू शकता की तुम्ही कुठे जायला हवं, कुठे जाऊ नये, कुठे तुमचा सन्मान होईल आणि कुठे तुमचा अपमान होईल. त्यामुळे अर्चना जी, मला वाटतं की पैशासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनासाठी अशा आडव्या-तिडव्या ठिकाणी जाणं तुम्ही थांबवलं पाहिजे’ असंही त्यांनी पुढे नमूद केलं.
जिथे कुटुंबाचा मान नाही तिथे…
‘ कारण जिथे कुटुंबाचा सन्मान होत नाही, तिथे पैसा आणि तिथलं काम काय कामाचं? ‘लेटेंट’वर तुम्ही गेलात आणि तुमच्या मुलांना, तुम्हाला ‘नल्ला’ म्हटलं गेलं, कुटुंबाला, पतीला आणि तुम्हाला बेरोजगार म्हटलं गेलं, त्यामुळे वाईट वाटलं. सॉरी, पण खरंच वाईट वाटलं’ असंही सुनील पाल यांनी आपल्या व्हिडीओ पुढे म्हणत नाराजी दर्शवली.
यापूर्वी सुनील पाल यांनी समय रैनावर आणि त्याच्या शोवरही टीका केली होती. त्यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं.
Leave a Reply