• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मेनोपॉजवर बोलताच फसला अभिनेता, गौहर खानने सर्वांसमोरच काढली इज्जत

July 29, 2026 by admin Leave a Comment


Gauahar Khan Nikhil Chinapa Controversy : ‘अलायन्स’ या बहुचर्चित रिॲलिटी शोमधील स्पर्धा फक्त शोपुरती मर्यादित राहिलेली नाही तर त्याची सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा होत आहे. अभिनेत्री गौहर खान आणि स्पर्धक निखिल चिनप्पा यांच्यातील शाब्दिक वाद सध्या खूप चर्चेत आहे. गौहरने एका विषयावर मत व्यक्त केल्यावर, निखिलने तिच्या मतचा संबंध मेनोपॉजशी जोडणारं विधान केलं. ते ऐकून गौहर खान प्रचंड भडकली असून तिने त्याला फटकारत आपली नाराजी व्यक्त केली आहे. निखीलचं बोलणं ऐकून गौहरच्या रागाचा पारा चढला आणि ती खूप भडकली. त्याचं वक्तव्य फक्त असंवेदनशील नव्हे तर निखिलला त्याची विचारसरणी सुधारण्याची गरज आहे, असंही गौहरने सुनावलं. त्या दोघांमधील वाद हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

गेमप्लेवरील टीकेनंतर वादाला सुरुवात

‘अलायन्स’मध्ये अभिनेत्री गौहर खानचा पती जैद दरबार स्पर्धक म्हणून सहभागी आहे. गौहर सोशल मीडियावर त्याला सातत्याने पाठिंबा देताना दिसते. याचदरम्यान तिने निखिल चिनप्पा आणि मिनी माथुर यांच्या गेमप्लेवर टीका करत, दोघे मिळून खेळत असल्याचा आरोप केला. तसेच इतर स्पर्धकांना योग्य संधी मिळत नसल्याचेही तिने म्हटलं होतं.

त्यानंतर एका मुलाखतीत गौहरच्या टीकेबद्दल निखिल याला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आपली कधीच गौहरशी कधीही वैयक्तिक भेट झालेली नाही, असं त्याने सांगितलं. मात्र पुढे तो जे बोलला, ते गौहरला बिलकूल आवडलं नाही. निखल चिनप्पा पुढे म्हणाला की, मिनी माथुरला मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉजबाबत अधिक माहिती आहे, त्यामुळे गौहरने अशी प्रतिक्रिया का दिली असेल हे ती अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील. त्याचे हे वक्तव्य ऐकून अनेक जण हैराण झाले, गौरही संतापली. त्याच्या या विधानामुळे गौहरच्या मताचा संबंध तिच्या हार्मोनल बदलांशी जोडल्याची टीका झाली.

गौहरचा संताप; ‘महिलांच्या आरोग्याची खिल्ली उडवू नका’

निखिलचे वक्तव्य व्हायरल होताच गौहरने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तीव्र प्रतिक्रिया दिली. महिलांच्या आरोग्याशी संबंधित नैसर्गिक प्रक्रियेचा वापर एखाद्या महिलेचे मत कमी लेखण्यासाठी करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचं तिने म्हटलं. इतक्या अनुभवी व्यक्तीकडून अशी अपरिपक्व टिप्पणी अपेक्षित नव्हती, असेही गौहर म्हणाली.

मी 9 महिन्यांपूर्वीच आई झाले 

पुढे गौहरने सांगितलं की तिने निखिलच्या वैयक्तिक आयुष्यावर नव्हे, तर केवळ त्याच्या गेमप्लेवर भाष्य केलं होतं. “तुम्ही मला मेनोपॉजच्या टप्प्यात असल्याचे गृहीत धरत आहात. पण मी अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच आई झाले आहे. त्यामुळे तथ्यांची पडताळणी करूनच बोलावे,” असं तिने त्याला सुनावलं.

माफीची मागणी

मेनोपॉज ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील नैसर्गिक अवस्था असून तिचा वापर कोणाचे मत कमी लेखण्यासाठी होऊ नये, असं गौहरने ऐकवलं. तसेच निखिलने आपल्या वक्तव्याबद्दल पत्नी आणि घरातील महिलांची माफी मागावी, अशी मागणीही तिने केली. दरम्यान, ‘अलायन्स’च्या रविवारी प्रसारित झालेल्या भागात निखिल चिनप्पा स्पर्धेतून बाहेर पडला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in