• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा

July 17, 2026 by admin Leave a Comment


मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप झाला आहे. ग्वाटेमालाच्या सीमे लगत असलेल्या दक्षिण मेक्सिकोच्या पॅसिफिक किनारपट्टीवर हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मेक्सिको सिटीपासून एल साल्वाडोरपर्यंत या भूकंपामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर अद्याप कोणत्याही मोठ्या प्रमाणात जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी संकट मात्र टळलेले नाही. प्रशासनाने किनारी प्रदेशात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.

अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र चियापास किनारपट्टीजवळील अक्विलेस सेरदानपासून सुमारे 48 किलोमीटर नैऋत्येस होते. या भूकंपाची खोली जमिनीखाली 15 किलोमीटर होती. मुख्य भूकंपापूर्वी समुद्रात कमी तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला होता. त्यामुळे त्सुनामीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

300 किलोमीटर परिसरात सुनामीचा धोका

या भूकंपामुळे ग्वाटेमाला सिटीमधील अनेक इमारती हादरल्या, तसेच शेजारील एल साल्वाडोरमध्येही जोरदार धक्के जाणवले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या सुनामी वॉर्निंग सिस्टीमने भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटरच्या परिसरातील किनारपट्ट्यांवर धोकादायक सुनामीच्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे.

यामध्ये दक्षिण मेक्सिको आणि ग्वाटेमालाच्या किनारपट्टीचा समावेश असून, येथे सुमारे 3 फूट (1 मीटर) उंचीच्या सुनामीच्या लाटा उसळू शकतात. तसेच कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वाडोर, एल साल्वाडोर, होंडुरास, निकाराग्वा, पनामा आणि पेरू यांच्या पॅसिफिक किनारपट्ट्यांवर 1 फूट (0.3 मीटर) उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासन सतर्क

मेक्सिको आणि ग्वाटेमालाच्या सीमेजवळील सुचियाते शहराचे महापौर एल्मर वाझक्वेझ गॅलार्डो यांनी सांगितले की, किनारपट्टीवरील भागांमध्ये त्सुनामीच्या धोक्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. मेक्सिकोच्या दक्षिणेकडील प्रमुख शहर तापाचुला येथे सुरुवातीला भूकंपाचे धक्के सौम्य होते, मात्र त्यानंतर त्यांची तीव्रता वाढली आहे.

भीतीमुळे नागरिक रस्त्यावर

तापाचुला येथील एका सार्वजनिक रुग्णालयातील कर्मचारी अलेजांद्रा मेंडोझा यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले, ‘आम्ही दुसऱ्या मजल्यावर असताना इमारत हलू लागली. सुरुवातीला भूकंप थांबेल असे वाटले, पण धक्के अधिक तीव्र झाल्याने आम्ही सर्वजण शांतपणे खाली उतरून रुग्णालयाच्या आवारात आलो. दरम्यान, ग्वाटेमाला सिटीमध्येही भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक लोक घराबाहेर आणि रस्त्यांवर आल्याचे पहायला मिळाले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in