
फिरण्यासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका क्रूझचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. 72 वर्षीय रियाज हुसैन देखील क्रुझने प्रवास करत होते… क्रुझ पाण्यत डुबत असताना, पाणी रियाज यांच्या मानेपर्यंत पोहोचलं होतं. तब्बल 3 तास त्यांनी जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष केला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपतात मृत्यूमुखी पावलेल्या 9 प्रवाशांचे मृतदेह आढळले आहे. गुरुवारी संध्याकाळी, जेव्हा क्रूझ नर्मदा नदीच्या खाडीत पोहोचली, तेव्हा हवामानात अचानक बदल झाले. जोरदार वारे वाहू लागले आणि पाण्यात उंच लाटा उसळू लागल्या.
बदलत्या वातावरणाचा परिणाम क्रूझवर झाला, क्रूझ हलू लागली. अशात प्रवासी आरडाओरडा करू लागले… तर काही जण लाईफ जॅकेटच्या शोधात होते… तर काही जण सर्वात आधी कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करु लागले. रियाज हुसैन देखील कुटुंबासोबत क्रूझमधून प्रवास करत होते. पण हा प्रवास आयुष्यातील सर्वात धोकादायक प्रवास ठरेल असं त्यांना बिलकूल वाटलं नव्हतं…
रियाज म्हणतात, त्यांना असं वाटलं, आता स्वतःचे प्राण वाचवणं अशक्य आहे… चारही बाजूला पाणी… सर्वत्र अंधार… क्रूझवर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा… भयानक आवाज… तेव्हा रियाज यांच्या मनात एक विचार आला आणि तो म्हणजे, ‘सगळे पाण्यात डुबत आहेत आणि मी देखील पाण्यात जाणार…’
पण रियाज यांनी हिंमत सोडली नाही. जवळपास तीन तास रियाज त्याच परिस्थितीत राहिले. पाणी मानेपर्यंत होतं… अंग थंडीने थरथर कापत होतं… श्वास घेण्यात अडचणी येत होत्या… याच दरम्यान, त्यांना बाहेरील लोकांचा आवाज येवू लागला. अशात त्यांनी प्रचंड ताकदीने क्रूझवर हात मारण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून बचाव पथक देखील तेथे येऊन पोहोचला.
बचाव पथकाने गॅस कटरचा वापर करून क्रूझचे छत कापले आणि अखेरीस रियाज यांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, या चमत्कारिक सुटकेनंतरही रियाज अद्यापही दुःखी आहेत. कारण त्यांची पत्नी आणि नातेवाईक अद्यापही बेपत्ता आहेत.
23 लोकांचा बचाव, तर 9 मृतदेह सापडले
गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली एक क्रूझ बर्गी धरणाजवळ नर्मदा नदीच्या खाडीत दाखल झाली. बदलेल्या हवामानामुळे गंभीर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन, पोलीस, होमगार्ड, एसडीआरएफ आणि नंतर एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत 23 जणांना वाचवण्यात आले असून, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं आहे.
Leave a Reply