
आयपीएल 2026 सीजनमध्ये 400 धावांचा टप्पा गाठणारा वैभव सूर्यवंशी पहिला फलंदाज ठरला आहे. पंजाब किंग्स विरुद्ध वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यात त्याने पाच सिक्स आणि तीन फोर मारले. वैभव सूर्यवंशी क्रिकेटिंग शॉट्स पाहून माजी कर्णधार सुनील गावस्कर प्रभावित झाले.
वैभव सूर्यवंशी समोर टीम इंडियाचा स्ट्राइक बॉलर अर्शदीप सिंह होता. अर्शदीपने दोन अचूक यॉर्कर टाकून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही वैभवने त्याच्या ओव्हरमध्ये 6,4,4, अशी फटकेबाजी करुन ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या.
डोनोवॅन फरेरा आणि शुभम दुबे यांनी अवघ्या 32 चेंडूत नाबाद 77 धावांची भागीदारी करुन राजस्थान रॉयल्सला अजेय असलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सवर विजय मिळवून दिला. या विजयात वैभव सूर्यवंशीने मोलाचं योगदान दिलं.
सीमारेषेवर 10 फिल्डर ठेवले तरी या 15 वर्षाच्या मुलाला रोखणं अशक्य आहे असं सुनील गावस्कर म्हणाले. सुनील गावस्कर यांचं हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. कारण यातून वैभव सूर्यवंशीचं टॅलेंट दिसून येतं.
तो क्रिकेटिंग शॉट्स खूप उत्तम मारतो. सीमारेषेवर 10 क्षेत्ररक्षकही त्याच्यासाठी अपुरे आहेत. तो अजिबात विचलित दिसत नाही. हा इतकं तरुण असण्याचा फायदा आहे असं मला वाटतं” असं सुनील गावस्कर म्हणाले. “तुम्ही कशाचीही फिकिर करत नाही. तुमच्या समोर कोण विरोधक आहे, याचा फिकिर करत नाही” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले.




Leave a Reply