• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रियकरासाठी सोडले पतीला, पण…तिथेच प्लॅन फसला… बसला मोठा धक्का, घडलं तरी काय?

May 1, 2026 by admin Leave a Comment


Woman Left Husband for Lover: कर्माचा फेरा विचित्र असल्याचे म्हटले जाते. एका महिलेने प्रियकरासाठी पतीला सोडले. त्याच्यासोबत काही दिवस राहिल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. मग काय महिलेने टोकाचे पाऊल उचलले. आपल्याला कोणीतरी न्याय मिळवून द्या अशी ओरड ती करू लागली. तिने पेट्रोलची कॅन उचलली आणि थेट पोलिस स्टेशनसमोर पोहचली. एकतर पतीच्या घरी पाठवा नाहीतर प्रियकराला लग्न करण्यास भाग पाडा अशी विचित्र अट तिने ठेवली. तिचा पवित्रा पाहून पोलीस ही हबकले. पण पोलिसांनी वेळप्रसंगी तिच्या हातातील पेट्रोल कॅन हिसकावली आणि पुढील अनर्थ टळला.

दोन वर्षांपूर्वी तरुणाशी जुळले सूत

या महिलेचे दोन वर्षांपूर्वी घराशेजारी राहणाऱ्या तरुणाशी सूत जुळले. तरुणाचे आणि तिचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये शारीरिक संबंध आल्यानंतर तिने त्याच्याशी लग्न करण्यास दबाव टाकला. त्याने लागलीच लग्न करण्यास होकार दिला. दोघेही घरातून पळून गेले. पत्नीने नंतर पतीकडून घटस्फोट घेतला. त्यानंतर ते बरेच दिवस एकत्र राहिले. पण पुढे तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने अखेरीस पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात जास्त लक्ष दिले नाही. त्यानंतर पंच जमले. त्यांनी तरुणाला त्या महिलेशी लग्न करण्यास सांगितले. पण प्रियकराने लग्नास नकार दिला. त्याच्या घरच्यांनी सुद्धा लग्नास नकार दिला.

गुरुवारी महिला अखेरीस पुन्हा पोलिस ठाण्यात पोहचली. तिने प्रियकराशी लग्नाचा तगादा लावला नाही तर जुन्या पतीकडे पाठवण्याची मागणी केली. महिलेने सोबत पेट्रोलची कॅन आणली. पोलिसांनी तिची समजूत काढली. तिची तक्रार नोंदवून घेतली. आता आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. महिलेचे समुपदेशन केले.

काय आहे प्रकरण?

उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील बाजपूर येथील हे प्रकरण आहे. महिलेचे लग्न 2008 मध्ये झाले होते. ती पती आणि सासरकडील मंडळींसह राहत होती. पण गेल्या दोन वर्षात शेजारील तरुणासोबत तिचे सूत जुळले. त्यानंतर दोघांमध्ये नको ते घडले. दोघांच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ सुद्धा तयार झाले. याची कुणकुण कुटुंबाला लागली. पती-पत्नीत वाद झाला. आपल्याला तरुणाने गुंगीचे औषध दिले आणि संबंध ठेऊन व्हिडिओ काढल्याचा आरोप महिलेने केला. तिला पतीने घटस्फोट दिला. तोपर्यंत ती तरुणासोबत दुसरीकडे राहू लागली. प्रियकराच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केल्यानंतर प्रियकराने तिच्याशी संबंध नाकारले आणि तिला एकटीला सोडून तो गावात परतला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्या व्यंगचित्रावरून सुषमा अंधारेंचा प्रचंड संताप; राणे ते खोत, पडळकर ते भुजबळ एकलाही सोडलं नाही, सगळंच काढलं
  • Mumbai | कलिंगडानंतर मृत्यू प्रकरणाला नवे वळण: डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
  • भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…
  • Multibagger stock: गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा; 370 टक्क्यांची तुफान तेजी, हा शेअर कोणता?
  • शेजारील राज्यात 44 मोरांच्या मृत्यूने खळबळ, H5N1 ला दुजोरा,10 किमी क्षेत्रात कंटेनमेंट झोन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in