
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत सुट्टीसाठी मालवणमध्ये आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एका रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमध्ये झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे 25 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. श्रेणीक मिलिंद टाकळे असं या तरुणाचं नावं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा स्विमिंग पूल छोट्या मुलांसाठी तयार करण्यात आल्याने तो जास्त खोल नव्हता. मात्र हे या तरुणाच्या लक्षात आलं नाही, त्याने उंचावरून या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, मात्र त्याचं डोक या स्विमिंग पुलाच्या तळाशी जोरदार आपटलं, या दुर्घटनेत श्रेणीक टाकळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मालवणमधील वायरी स्थित मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये घडली आहे.
या अपघातामध्ये मृत्यू झालेला तरुण हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील इस्लामपूरचा रहिवासी होता. तो आपल्या दाहा मित्रांसोबत पर्यटनासाठी कोकणात आला होता. ही दुर्घटना 20 जून रोजी घडली आहे, परंतु त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दुपारची वेळ होती, पर्यटनासाठी आलेल्या मित्रांपैकी काही मित्र हे दुपारच्या वेळी आराम करत होते, तर काही या स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा आनंद घेत होते. हा स्विमिंग पूल लहान मुलांसाठी बनवण्यात आला होता, त्यामुळे त्याची खोली खूप कमी होती. हे या तरुणाच्या लक्षात आलं नाही, त्याने तब्बल 8 ते 10 फुटांवरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, खोली कमी असल्यामुळे श्रेणीकचं डोकं स्विमिंग पुलाच्या तळाशी आदळलं, त्याच्या डोक्याला मार लागला आणि ते बेशुद्ध झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत सुट्टीसाठी मालवणमध्ये आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एका रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमध्ये झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे 25 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. pic.twitter.com/oxgzu43QVK
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2026
दरम्यान ही घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही, डॉक्टरांनी तपासून या तरुणाला मृत घोषीत केलं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच श्रेणीकचे आई वडील आणि इतर नातेवाईक तातडीने मालवणला पोहोचले, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Leave a Reply