• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन होणार दूर , LIC च्या या 3 पॉलिसी मिडील क्लाससाठी सर्वात भारी

July 31, 2026 by admin Leave a Comment


LIC Child Plans 2026: प्रत्येक पालकांचे स्वप्न त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे करुन त्यांच्या लग्नात कोणताही आर्थिक तंगी येऊ नये असे असते. परंतू आजकाल ज्या वेगाने शिक्षण आणि इतर गोष्टीचा खर्च वाढत आहे. ते पाहाता वेळीच चांगल्या जागी गुंतवणूक करणे गरजेचे झाले आहे. भारतात सुरक्षित गुंतवणूकीचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी एलआयसीचे नाव समोर येते. एलआयसीकडे मुलांच्या उज्वल भविष्या करीता अनेक प्लान आहेत. ज्यातून चांगला परतावा मिळतो. तसेच अचानक आर्थिक अडचण आली तरी मुलांचे शिक्षण थांबत नाही. चला तर एलआयसीचे चांगले चाईल्ड प्लान कोणता हे पाहूयात..

1- LIC अमृतबाल (प्लान 874)

हा एलआयसीच्या सर्वात नवीन आणि प्रसिद्ध योजनेचे नाव अमृतबाल आहे. याला मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा फंड तयार करण्याच्या इराद्याने तयार केले आहे. जर तुमच्या घरी एक महिने ते १३ वर्षांपर्यंतचे मुल असेल तर त्याच्या नावाने तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता. यात रिटर्न संपूर्ण गॅरंटी मिळते. पॉलिसीत जर दरवर्षी 80 रुपये प्रति हजार विमा रक्कम ( सम एश्योर्ड ) च्या हिशेबाने पक्का बोनस जोडला जातो. यात तुम्ही १० ते २५ वर्षे पैसे जमा करण्याचा पर्याय निवडू शकता. जेव्हा तुमचे मुल १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान होईल तेव्हा एक मोठी रक्कम मिळेल जी त्याच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करेल.

2- LIC चिल्ड्रन्स मनी बँक (प्लान 832)

मुलांच्या शिक्षणासाठी अनेकवेळा असे होते की अचानक मोठ्या रकमेची गरज लागते. अशात मनी बॅक प्लान खुपच कामी येतो. यात नवजात मुलापासून ते १२ वर्षाच्या मुलासाठी हा प्लान घेता येतो. या प्लानचा सर्वात मोठा फायदा हा की मुल 18, 20 आणि 22 वर्षांचे होते. तेव्हा एकूण विमा रक्कमेचा 20-20 टक्के हिस्सा तुम्हाला परत मिळू शकतो. यानंतर मुल जेव्हा २५ वर्षांचे होते, तेव्हा पॉलीसी मॅच्युर होते. त्यावेळी उरलेली ४० टक्के रक्कम आणि संपूर्ण बोनस एक साथ तुम्हाला मिळतो.

3- LIC जीवन तरुण (प्लान 834)

हा प्लान 90 दिवसाच्या शिशु पासून ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आहे. याची सर्वात मोठी खासियत याची फ्लेक्सिबिलिटी आहे. पालक आपल्या नियोजनानुसार हिशेब निश्चित करुन मुल २० ते २४ वर्षांचे होईल तेव्हा त्यांना मनी बॅकच्या रुपात किती पैसे हवे. तुम्हाला हवा तसा 0%, 5%, 10% आणि 15% चा पर्याय निवडू शकता. यानंतर २५ व्या वर्षी जेव्हा पॉलीसी पूर्ण होईल तेव्हा उरलेला सर्व पैसा मॅच्युरिटी म्हणून तुमच्या मुलाला मिळेल.

प्रीमियम वेवर रायडर जोडणे गरजेचे

मुलांसाठी एलआयसीच्या कोणताही प्लान घेताना ‘प्रीमियम वेवर बेनिफिट’ (PWB) रायडर असणे गरजेचे आहे. जर कोणत्याही कारणाने पॉलीसीच्या दरम्यान आई-वडीलांसोबत कोणताही अपघात झाल्यास, तर रायडरच्या कारणाने पॉलीसी बंद होत नाही. पुढील सर्व हप्ते एलआयसी स्वत: भरते आणि मुलांना निश्चित कारणाने संपूर्ण पैसे मिळतात.

याशिवाय या सर्व प्लानमध्ये इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सुट देखील मिळते. तसेच मॅच्युरिटी आणि मनी बॅकवर मिळणाऱ्या रक्कमेवर कोणताही टॅक्स लागत नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in