
Thalapathy Vijay Divorce : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि माजी अभिनेते थलपती विजय गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजय आणि पत्नी संगीता सोर्नालिंगम यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगलेली असताना दोघांमधील कायदेशीर लढाई आता संपली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता यांनी कोर्टात माघार घेतल्यानंतर हे प्रकरण मिटलं आहे. सांगायचं झालं तर, फेब्रुवारी 2026 मध्ये संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला. पण आता त्यांनी याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे आता दोघांचा घटस्फोट होणार नाही. सांगायचं झालं तर, संगीता यांनी हा मोठा निर्णय घेतलेला नाही. तर एका खास व्यक्तीने त्यांचं नातं टिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला
चेंगलपट्टू जिल्हा कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणावर यापूर्वी तीनदा सुनावणी झाली होती आणि 7 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सुनावणी झाली. या कार्यवाहीदरम्यान, संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटाचं प्रकरण बंद करण्याची विनंती केल्याने या प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतलं. न्यायालयाने ही विनंती मान्य केली आणि प्रकरणाची पुढील कार्यवाही थांबवली.
विजय यांच्या आईने घेतला पुढाकार..
संगीता यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं असून अनेक तर्क – वितर्क लावले जात आहे. रिपोर्टनुसार, संगीता यांनी हा निर्णय सासू आणि विजय यांच्या आई यांच्या सांगण्यावरुन घेतला आहे… मुलाचं घर वाचवण्यासाठी आई शोभा चंद्रशेखर यांनी सून संगीता यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली आणि त्यांची समज घातली… सासूने सांगितल्यानंतर संगीता यांनी स्वतःचा निर्णय बदलला आणि विजय यांच्यासोबत असलेलं नातं कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पण यावर संगीता यांनी अद्याप कोणतंच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
संगीता यांनी विजय यांच्यावर लगावलेले गंभीर आरोप…
संगीता यांनी विजय यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे विजय यांचं 2021 पासून दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. विज यांनी हे संबंध संपवण्याचे आश्वासन पत्नीला दिलं होतं, तरीही त्यांनी तसं केलं नाही, असा दावा संगीता यांनी केला. त्यानंतर वाद वाढत गेला; अखेर संगीता यांनी विजय यांच्यावर मानसिक छळ आणि साथ न दिल्याचाही आरोप केले. यानंतर, त्यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये Special Marriage Act, 1954 अंतर्गत चेंगल्पट्टू न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.
Leave a Reply