
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ५०८ किमीचे हे अंतर अवघ्या २ ते ३ तासात कापले जाणार आहे. या महत्वाकांक्षी मार्गासोबत देशातील दक्षिण भारतात देखील बुलेट ट्रेनचे जाळे विणले जाणार आहे. या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये दक्षिण भारतातील महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरीडॉर ज्या प्रकारे पश्चिम भारतात नवीन आर्थिक वेग आणणार आहे. तसेच दक्षिण भारतात ‘हाय स्पीड डायमंड’ तयार केला जाईल. यात आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये कनेक्टिव्हीटी जोडली जाणार आहे.
कोणत्या शहरांना हायस्पीड नेटवर्कने जोडणार
प्रस्तावित हायस्पीड नेटवर्कमध्ये अमरावती, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरु, पुणे आणि मुंबई सारख्या प्रमुख शहरांना जोडणारे मार्ग आखले जाणार आहेत. ही योजना जर कागदावर उतरली तर अनेक शहरातील प्रवासाचा वेग खूपच कमी होईल.
अमरावती ते हैदराबाद – केवळ 70 मिनिटे
अमरावती ते चेन्नई – 112 मिनिटे
हैदराबाद ते पुणे – 1 तास 55 मिनिटे
पुणे ते मुंबई – 48 मिनिटे
चेन्नई ते बंगलुरु – 73 मिनिटे
हैदराबाद से बेंगलुरु – सुमारे 2 तास 8 मिनिटे
काय होणार फायदा ?
हाय-स्पीड रेल केवळ प्रवासाचे साधन राहणार नाही तर आर्थिक बदलाचे इंजिन होणार आहे. जेव्हा मोठी शहरे एकमेकांना हायस्पीड रेलनेटवर्कने जोडली जातील तेव्हा उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की उदा. मुंबई ते अहमदाबाद बुलेट प्रकल्पामुळे मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद एक आर्थिक क्षेत्र बनतील. तशाच प्रकारे दक्षिण भारतातील शहरांचे विकास मॉडेल तयार केले जाईल.
आंध्र प्रदेशाला मिळणार मोठी भेट
रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केली की प्रदीर्घकाळापासून प्रतिक्षित असलेल्या साऊथ कोस्ट रेल्वेने झोनला १ जून २०२६ रोजी अधिसूचित केले जाईल.हा आंध्रप्रदेशसाठी एक मोठा प्रशासकीय आणि राजकीय उपलब्धी मानली जाणार आहे. तसेच कोलकाता ते चेन्नईपर्यंत सध्याचा दुपदरी रेल्वे मार्गाला चौपदरी केले जाणार आहे. यामुळे सुमारे ५०० नवीन ट्रेनचे संचलन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्यात मालगाडी आणि प्रवासी गाड्या दोन्हींचा समावेश आहे.
रेल्वे बजेट आणि इंफ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ
आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचे संयुक्त रेल्वे बजेट आधी ८८६ कोटी रुपयांचे होते.आता एकट्या आंध्रप्रदेशाला १०,१३४ कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यात सध्या १.०६ लाख कोटी रुपयांहून अधिक रेल्वे योजनांवर काम सुरु आहे. याशिवाय ७४ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण देखील केले जाणार आहे.
Leave a Reply