• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबई उडवण्याचा कट! 9 जणांना अटक; मोठ्या दहशतवादी हल्ल्याआधीच…दिल्लीतून मोठी माहिती समोर!

May 30, 2026 by admin Leave a Comment


 Delhi Police Arrested 9 Terrorist : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जाणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आल आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर मुंबई शहरदेखील होते.

नऊ जणांना ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. त्यांचा दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यांनी मुंबईतील दादर तसेच इतर परिसराची रेकी केली होती, अशीही माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी आहेत. ते पाकिस्तानातील शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.

दादर रेल्वे स्थानकाचे व्हिडीओ

या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली आहे. त्यात पोलिसांना 9 जणांकडे अनेक संशयित साहित्या आढळून आले आहे. त्यांच्याकडे दिल्ली, मुंबईतील अनेक ठिकाणचे व्हिडीओ आले आहेत. या व्हिडीओमध्ये दादर रेल्वे स्थानकाचेही व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमध्ये अणुउर्जा केंद्र, विमानतळ, रेल्वेस्टेशन, विजनिर्मिती केंद्र टार्गेटवर होते. त्यांच्याकडे ग्रेनेड तसेच अनेय अत्याधुनिक शस्त्रं सापडली आहेत.

तपास यंत्रणा अलर्ट मोडवर

दरम्यान, हा कट उधळल्यानंतर आता दिल्ली, मुंबईतील पोलीस अलर्ट मोडवर गेले आहेत. पोलिसांकडून तपास यंत्रणेला अलर्ट राहण्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीत पकडण्यात आलेल्या 9 जणांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येते का? ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in