• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत दबदबा असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक झाली. आयपीएल 2026 स्पर्धेत दहा सामने खेळल्यानंतरच मुंबई इंडियन्स आऊट होणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्यामुळे हार्दिक पांड्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघात बऱ्याच उलथापालधी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. काही रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कर्णधारपदच नाही तर संघ सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता हार्दिक पांड्याला संघातील चार खेळाडूंची साथ मिळाली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. चार जण कोण? हे काही स्पष्ट नाही. पण आग लागण्यापूर्वीच धूर निघाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचे फड रंगले आहेत.

रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॅनेजमेंटने त्याचं म्हणणंही मान्य केलं आहे. दुसरीकडे, एका पत्रकाराच्या दाव्यानुसार हार्दिक पांड्या जेव्हापासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हापासून चार खेळाडूंची त्याला साथ मिळाली नाही. आता हे चार खेळाडू कोण? हे मात्र स्पष्ट नाही. दाव्यानुसार, याच कारणामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघाची हाराकिरी झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला, तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

WHAT HURT HARDIK PANDYA THE MOST. ⁉

– Pandya was immensely hurt with the fact that senior players, who demanded 100% commitment when he played T20is for India, were not exactly returning the favour when Hardik was MI captain. (PTI). pic.twitter.com/vmXoQ8Py8K

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2026

HARDIK DECIDED TO QUIT MID SEASON.

– Hardik Pandya was mentally stressed and completely exhausted after disastrous IPL.

Pandya set to quit MI and conveyed this to the team management mid-season. (PTI). pic.twitter.com/jf72RVuaHe

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2026

हार्दिक पांड्यानंतर कर्णधार कोण?

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघ सोडला तर कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा प्रश्न आहे. फ्रेंचायझीमध्ये या पदासाठी तीन दावेदार आहे. यात पहिलं नाव सूर्यकुमार यादवचं आहे. पण त्याचं वय आणि त्याची कामगिरी पाहता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणं शक्य दिसत नाही. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह या शर्यतीत आहे. त्याने या पर्वात कर्णधारपद भूषवलं होतं. त्यात मुंबईला यशही मिळालं होतं. त्यामुळे त्याच्या पर्याय समोर असेल. तिसरा पर्याय हा दूरदृष्टी ठेवून असणार आहे. तिलक वर्माकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. त्याने टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचं नावही आघाडीवर आहे. त्यामुळे बुमराह किंवा तिलक या पैकी एकाची निवड होऊ शकते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in