• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

June 30, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील चेंबूर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान 10 मुलांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून काही विद्यार्थी बसमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

प्राथमिक माहितीनुसार, बसमधील जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एका विद्यार्थ्याचा बसमध्ये अडकलेला असल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

घटनेनंतर अग्निशमन दल, महानगरपालिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून बसवरील झाड हटवण्याचे काम सुरू आहे. ही बस कोणत्या शाळेची होती, बसमध्ये एकूण किती विद्यार्थी होते आणि अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सध्या प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in