• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत बेस्ट डेपोमध्ये अग्नितांडव, एकामागून एक दोन बसेस जळून खाक, रात्रीच्या अंधारात काय घडलं?

May 25, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील सायन येथील प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपोमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या दीड तासाच्या अंतराने एकामागून एक अशा दोन बेस्ट बसेसला अचानक आग लागल्याने डेपो परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत दोन्ही बसेसची आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले.

अवघ्या दीड तासात दोन बसेस जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा नगर डेपोमध्ये पहिली आग मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास लागली. या बसला आग लागल्याचे समजताच डेपोतील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान पहिल्या बसची आग विझवत असतानाच, साधारण तास-दीड तासाच्या अंतराने डेपोत उभ्या असलेल्या दुसऱ्या बसनेही अचानक पेट घेतला.

एकाच रात्री लागोपाठ दोन बसेसला आग लागल्यामुळे डेपो प्रशासनात आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही आगींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

एक बस कुलाबा मार्गावरील, तर दुसरी ‘आयपीएल’साठी राखीव

या दोन्ही बसेस रोजच्या वापरातल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली बस ही कुलाबा येथून आपली प्रवासी फेरी पूर्ण करून प्रतीक्षा नगर डेपोमध्ये परतली होती आणि तिथे पार्क केलेली होती. तर दुसरी बस ही आयपीएल (IPL) सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राखीव (Reserved) ठेवण्यात आली होती.

या दोन्ही बसेसला अचानक आग कशी लागली, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली की यामागे इतर काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास बेस्ट प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे. सुदैवाने या आगीच्या वेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच डेपोतील सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी…
  • भाड्याच्या छोट्याशा खोलीतून आज..; 25 व्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’ फेम अनुश्री मानेनं घेतलं हक्काचं घर
  • बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही’, बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
  • Uniform Civil Act : मोठी बातमी! राज्यात समान नागरी कायद्यासाठी समिती गठीत… अंमलबजावणी कधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in