• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी 92 ला कारसेवेत होतो, त्यानंतर…; सांगलीतील कार्यक्रमात CM फडणवीसांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

August 9, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील अण्णा डांगे यांच्या सत्कार कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अण्णा डांगे यांच्या राजकीय कारकि‍र्दीवर भाष्य केलं. फडणवीसांनी 92 साली कारसेवेत असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विविध पदांवर काम केले. नागपूरचा महापौर असतानाच्या आठवणींनाही फडणवीसांनी उजाळा दिला.

माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी अर्थात ९ ऑगस्ट रोजी नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉ. डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि शैक्षणिक संकुलातील विविध नवीन इमारतींचे उद्‌घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ मी भाजपमध्ये काम सुरू केलं.त्यावेळी अण्णासाहेब डांगे, दा. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही सगळी नेतेमंडळी होती. त्यांच्याकडे बघून काम करायचो. त्यांच्यापैकी कोणी नागपूरला आलं, तर त्यांच्या स्वागतासाठी हजर असायचो’.

‘मी 92 ला कारसेवेत होतो. त्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काही नेत्यांकडे बघून काम करायचो. संघर्ष करायचो. त्यातील एक नाव अण्णासाहेब डांगे यांचे होते. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून पाहिलं जायचं. युतीचं सरकार आलं, त्यावेळी ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांचा मान मोठा होता. गोपीनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर मान हा डांगे यांना होता. भाजपच्या कॅबिनेटआधीची बैठक ही डांगे यांच्याकडे व्हायची. त्याठिकाणी मंत्रिमंडळातील निर्णयावर चर्चा व्हायची, असे फडणवीसांनी अधोरेखित केले.

‘डांगे यांच्याकडे पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी होती. त्यांनी महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं ठरवलं होतं. अतिशय धाडसी निर्णय होता. या महाराष्ट्रातील लोकांसाठी पाणीपुरवठा करायचा. त्यासाठी निधी उभा करायचा. राज्यात पाणीपुरवठा करण्याचं काम डांगेंनी केलं. मी त्याकाळी महापौर होतो. महाराष्ट्र जीवप्राधिकरणाची रचना होती. त्यात एक महापौर एक सदस्य असायचा.त्याचा मी सदस्य होतो. त्यांच्या बैठकीत मी होतो. या बैठकीची शिस्त कडक असायची. त्यांच्या निर्णयानंतर कोणीही डांगेंना प्रश्न विचारत होते. शौचालयासाठी किती निधी ठेवला पाहिजे, या संदर्भात काय काय लागतं, तुम्ही कसं जास्त निधी वापरला, याचं वर्णन डांगे यांनी केलं. त्यावेळी सचिव चकीत झाले होते. महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जातं. हे मात्र खरं आहे. जीवनातील सुरुवात संघर्षातून झाली. हा संघर्ष जीवनभर पुरला. या संघर्षातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन करता येते. दरमजल करत त्यांनी जे कार्य केलं. त्यांचं कार्य चकीत करणारं आहे, असं फडणवीसांनी पुढे सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?
  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in