• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मी निवडून येईल की नाही…,’ ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ?

June 27, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारापैकी ६ खासदार शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवित नुकतेच फोडले. याआधी चार वर्षांपूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडू शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीचे सरकारच उलथवून टाकले होते. आता या फूटीनंतर पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले. त्यानंतर नव्या मिळालेल्या मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदारही शिंदे यांनी पळवल्याने उद्धव ठाकरे यांनी न खचता ज्या खासदाराला पळवले त्यांच्या मतदार संघात आपला दौरा सुरु केला आहे.

आज उद्धव ठाकरे यांच्या विदर्भात सभा झाल्या. त्यात ठाकरे यांनी पळून गेलेल्या खासदारांचा गद्दार असा उल्लेख करीत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. या टीकेवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आता प्रतिक्रीया दिली आहे. हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की साहेबांनी काहीही म्हणू द्या, साहेब जे म्हणतील ते सर आँखोपे, मी साहेबांना एकही शब्द उलटून बोलणार नाही असे आष्टीकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सभेत आष्टीकर यांच्या मुलाला तिकीट घेतल्याचा मुद्दा मांडला होता. त्याविषयी विचारता आष्टीकर यांनी मी म्हणालो तसे केले, मनातून लढलो पण दुर्दैवाने निवडणुकीला थांबू शकलो नाही. नाहीतर आपल्या मुलाचा विजय शंभर टक्के झाला असता अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी रक्तात गद्दारी भिनलेली असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना कोणच्या रक्तावर बोलू नये, कोणी कोणाचे रक्त पाहिले नाही, पण साहेबांवर मी एक शब्दही बोलणार नाही असे आष्टीकर यांनी म्हटले.

हिंगोलीच्या गद्दाराला धडा शिकवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या सभेत केले होते. यावर विचारले असता त्यांनी मी साहेबांना सॉरी बोललो आहे.या पेक्षा दुसरे कॉमेंट नाही. मी निवडून येईन की नाही ते काळ आणि वेळच ठरवेले अशीही प्रतिक्रीया खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार ऑपरेशन टायगर राबवून एकनाथ शिंदे यांनी पळवल्यानंतर आता उद्धव ठाकरे या मतदार संघात दौरे करुन जनतेची माफी मागत आहेत.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in