• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी धमक्यांना भीत नाही…, बिश्नोई गँगच्या धमकीनंतर झिशान सिद्दीकी यांचे मोठे विधान

August 14, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार जिशान सिद्दिकी यांना ऑडिओ क्लिप द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बिश्नोई गँगतर्फे जिशान अख्तर याने आठ दिवसात दोन वेळा जिशान सिद्दिकीला धमकी दिली आहे. पहिल्यांदा दिलेली धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून देण्यात आली होती मात्र दुसऱ्यांदा दिलेली धमकीत थेट जिशान सिद्दिकी यांच्या मोबाईलवर ऑडिओ क्लिप पाठवून दिली आहे. आता जिशान हे विदेशातून मुंबईत दाखल झाले असून त्यांनी वांद्रे पोलिसांत जाऊन या धमकीची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली आहे. यानंतर बोलताना सिद्दीकी यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले सिद्दीकी?

जिशान सिद्दिकी यांनी म्हटले की, ‘मला व्हाईस नोटद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यात मला तुझ्या वडीलांप्रमाणे जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्याआधी सोशल मीडियावरही दुसरी एक व्हाईस नोट व्हायरल झाली होती. ही खूप हैराण करणारी बाब आहे. जेव्हा माझ्या वडिलांना 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळी लागली होती, त्याच्या 3-4 महिने आधी अफवा उडाली होती की, आमच्या घरावर गोळीबार झाला आहे. त्यावेळी काय झालं हे मला माहिती नाही, मात्र त्यानंतर 2-3 महिन्यांनी माझ्या वडिलांवर गोळीबार झाला. त्यावेळी माझ्या वडिलांची सुरक्षा वाढवण्यात आली नव्हती.’

मी धमक्यांना घाबरत नाही – झिशान सिद्दीकी

पुढे बोलताना झिशान सिद्दीकी यांनी म्हटले की, ‘दुर्दैवाची बाब अशी की, वडिलांच्या निधनानंतर मला अनेक धमक्या आल्या आहेत, मात्र तरीही माझी सुरक्षा काढून टाकली आहे. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देवेन भारती यांच्याशी बोललेलो आहे. मला सतत धमक्या मिळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे माझ्या आईने दाखल केलेली रीट पिटिशनची तारीख जवळ आल्यानंतर आम्हाला धमकी मिळत आहे. मला वाटतं जी ठराविक बिल्डर लॉबी आहे ते काही लोकांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत. पण मी अशा धमक्यांना भीत नाही. मात्र पोलिसांना माहिती देणं काम आहे, आता त्यांची जबाबदारी आहे की माझी सुरक्षा वाढवायची की नाही.’



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in