• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी दिवसातून 5 वेळा नमाज अदा करते, दुसऱ्या धर्माच्या पुरुषासोबत..; प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्नाविषयी स्पष्ट मत

April 27, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रीम शेख नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या रिलेशनशिपबद्दल आणि लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. मी कधीच दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार नाही किंवा त्याच्याशी लग्न करणार नाही, असं रीमने स्पष्ट केलं. इतकंच नव्हे मी अशा नात्यात राहूच शकणार नाही, असं म्हणत रीमने त्यामागील कारणसुद्धा सांगितलं आहे. रीमने नुकतीच शार्दुल पंडितच्या पॉडकास्ट मुलाखतीत हजेरी लावली होती. यावेळी तिला आंतरधर्मीय लग्नबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “समज तू दुसऱ्या धर्माच्या पुरुषाच्या प्रेमात पडलीस, तर त्यामुळे तुझ्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतील का”, असा सवाल शार्दुलने रीमला केला.

यावेळी शार्दुलला उत्तर देताना रीम म्हणाली, “हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मी खूप धार्मिक आहे. लोकांना हे कदाचित माहीत नसेल, पण मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते, त्यामुळे मला तसं करणं शक्य होणार नाही. कारण मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते. मी रजमानमध्ये रोजा ठेवते. अलीकडेच मी पूर्णवेळ रोजा ठेवायला सुरुवात केली. जेव्हा कधी माझ्या आयुष्यात काही वाईट घडतं, तेव्हा मी सर्वांत आधी देवाकडे वळते आणि प्रार्थना करते. त्यामुळे जो माझ्या श्रद्धेचा आणि धर्माचा आदर करत नाही, अशा व्यक्तीसोबत मी माझं आयुष्य घालवू शकत नाही. मी असं करूच शकत नाही. त्यासाठी मला खूप शिव्या खाव्या लागतील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Reem Shaikh (@reemshaikh)

रीम शेखच्या आईवडिलांचा पाच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. एका पॉडकास्टमध्ये रीमने खुलासा केला होता की, तिचे आईवडील रोज भांडायचे, ज्यामुळे तिचं बालपण खूप दु:खात गेलं. तिने घरात इतकी हिंसा पाहिली होती की तिच्या मनात सतत राग आणि भीतीची भावना होती. तिच्यात कोणाशीही बोलण्याचं धाडस नव्हतं. रीमच्या आईने घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे. रीमचे तिच्या सावत्र बहिणीसोबत चांगले संबंध आहेत. रीमची आई शीतल हिंदू आहे आणि तिचे वडील मुस्लीम आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DMart Sale : पगार होताच डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? थांबा! या दिवसांमध्ये खरेदी केलीत तर होईल नुकसान
  • होम लोन हवंय? मग तुमचा ‘क्रेडिट स्कोर’ किती असावा? गृहकर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
  • उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा
  • GK : जगातील सर्वात स्लो ट्रेन, 10 तासांत कापते फक्त ‘इतके’ अंतर
  • रिक्षा चालकांना सर्वात मोठा दिलासा; सरकारनं घेतला मोठा निर्णय, शशांक राव यांची माहिती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in