• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी टीव्ही-टेबल तोडले पण..; श्वेता तिवारीच्या आरोपांवर राजा चौधरीने सोडलं मौन, म्हणाला ‘खोटं बोलणं तिच्या रक्तातच..’

July 30, 2026 by admin Leave a Comment


टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक असलेल्या श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी काही वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला. घटस्फोट होऊन बरीच वर्षे झाली तरी या दोघांमधील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. विभक्त होताना श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तर ते आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं सांगत राजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गंभीर दावे केले आहेत. इतकंच नव्हे तर ‘खोटं बोलणं तिच्या रक्तातच आहे’, असा खोचक टोलाही त्याने श्वेताला लगावला आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजा चौधरीला विचारण्यात आलं की, श्वेताने त्याच्यावर केलेले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप खरे आहेत का?

काय म्हणाला राजा?

प्रश्नाचं उत्तर देताना राजा म्हणाला, “हे सगळं खोटं आहे.. पूर्णपणे खोटं. मी कधीच श्वेतावर हात उचलला नाही. पण रागाच्या भरात मी अनेकदा घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. मी दरवाजा, टीव्ही किंवा टेबल तोडले असतील. पण मी श्वेतावर कधीही हाच उचलला नाही.” श्वेताला शिवीगाळ करायचा का, असाही सवाल राजाला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्याने सांगितलं, “कधीकधी लोक रागाच्या भरात काही शब्द बोलतात. पण कोणाचाही अपमान करण्याचा त्यांचा हेतू नसतो. मी दैनंदिन जीवनात अपमानास्पद भाषा वापरत नाही. पण वादाच्या वेळी माझ्याकडून काही अनुचित शब्द उच्चारले गेल्यास तो हेतुपुरस्सर केलेला अपमान मानला जाऊ नये.”

“खोटं बोलणं तिच्या रक्तातच..”

राजाने एका मुलाखतीत श्वेताला ‘अशिक्षित’ म्हटलं होतं. याबद्दल प्रतिक्रिया देत तो म्हणाला, “मी श्वेताच्या शिक्षणाबद्दल बोललो होतो. जर एखाद्याकडे दहावीचंही प्रमाणपत्र नसेल आणि तो पदवीधर असल्याचा दावा करत असेल, तर ते खोटं आहे. हुशार असणं ही एक गोष्ट आहे, पण सुशिक्षित असल्याचा दावा करणं खरं नाही. खोटं बोलणं तिच्या रक्तातच आहे. तिच्याकडे पदवी असेल तर तिने ती दाखवावी. ती प्रत्येक गोष्टीबद्दल खोटं बोलते. मी तिला रोज मारायचो, असे आरोप तिने केले होते. यापेक्षा मोठं खोटं दुसरं काय असू शकतं?”

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचं 1998 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2007 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या वेळी श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचार आणि दारूच्या व्यसनासह अनेक गंभीर आरोप केले होते. घटस्फोट झाल्यापासून त्यांची मुलगी पलक तिवारी आई श्वेतासोबतच राहतेय. आता इतक्या वर्षांनंतर राजाने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in