• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी खरं लिहिलं तर अर्धी इंडस्ट्री बर्बाद..; निळू फुले यांच्या बायोपिकबद्दल काय म्हणाल्या गार्गी?

July 13, 2026 by admin Leave a Comment


मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके निळू फुले यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. अभिनयक्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलेल्या निळू फुले यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी ‘शापित’, ‘सामना’स ‘सिंहासन’, ‘भुजंग’, ‘पुढचं पाऊल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. तर रंगभूमीवरही त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. ‘सखाराम बाईंडर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’, ‘जंगली कबूतर’ यांसारख्या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

वडील निळू फुले यांचा फोटो शेअर करत गार्गी फुले यांनी लिहिलं, ‘बाबा.. आज 17 वर्षे झाली तुला जाऊन. मिस यू.’ आजवर विविध मुलाखतींमध्ये गार्गी त्यांच्या वडिलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. एका मुलाखतीत त्या निळू फुले यांच्या बायोपिकविषयी म्हणाल्या, “प्रसाद ओक माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की, आपण निळू भाऊंवर बायोपिक करुयात का? तेव्हा मी थोडीशी मागे सरकले. कारण बाबाने स्वत:चं आत्मचरित्रसुद्धा लिहिलं नव्हतं. मी आत्मचरित्र लिहिलं तर मी खरं लिहेन आणि मी जर खरं लिहिलं तर अर्धी इंडस्ट्री बर्बाद होईल, असं ते म्हणायचे. हे सगळं बाबांना कधीच मान्य नव्हतं.”

गार्गी फुले यांची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Gargi Phule (@gargiphule)

निळू फुले यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. 13 जुलै 2009 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 250 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘बाई वाड्यावर या..’ हा त्यांचा डायलॉग आजही अनेकांच्या तोंडी असतं. त्यांनी प्रत्येक खलनायक इतक्या दमदार पद्धतीने साकारला की प्रेक्षक अक्षरश: त्या भूमिकेचा तिरस्कार करायचे.

निळू फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहेत. अभिनेता जॅकी श्रॉफनेही सोशल मीडियावर निळू फुले यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. ‘नीळू फुलेजींच्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांचं आदराने स्मरण करतो’, असं त्यांनी लिहिलं आहे. यासोबतच त्यांनी निळू फुले यांचा एक फोटो शेअर केला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
  • नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट, PM मोदींचा थेट बालेन शाह यांना फोन; नेमकी चर्चा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in