
Mirzapur movi‘मिर्जापुर: द मूवी’ रिलीज झाल्यानंतर आता ‘शूरवीर’ या गाण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. महाराणा प्रताप यांच्या शौर्याला समर्पित असलेल्या या गाण्याचा चित्रपटातील काही दृश्यांसोबत केलेला वापर योग्य नसल्याचे भाजपा नेते आणि राजस्थानचे माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र राठौर यांनी म्हटले आहे.e song contro
राजेंद्र राठौर यांनी CBFC ला पत्र लिहून ‘शूरवीर’ हे गाणे चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हे गाणे महाराणा प्रताप यांच्या साहस, बलिदान आणि स्वाभिमानाला समर्पित आहे. त्यामुळे ते गुंड, नशेखोर आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित दृश्यांमध्ये वापरणे योग्य नाही.
राठौर यांनी आपल्या पत्रात महाराणा प्रताप हे केवळ राजस्थानपुरते मर्यादित ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून देशभरात शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाशी आणि वारशाशी संबंधित गीताचा वापर करताना संवेदनशीलता पाळली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
सदर तक्रारीमध्ये गाण्याची गायिका रेपिया बालम यांच्या कथित आक्षेपाचाही उल्लेख करण्यात आला आहे. राठौर यांच्या पत्रानुसार, बालम यांनी ‘शूरवीर’ हे गाणे महाराणा प्रताप यांना श्रद्धांजली म्हणून तयार केले असल्याचे सांगितले असून, चित्रपटासाठी त्यांचा वापर करण्यापूर्वी परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा केला आहे.
या गाण्यावर करणी सेनेनेही आक्षेप घेतला असून, निर्मात्यांनी ते लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी केली आहे. आता या तक्रारीवर CBFC काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply