
वाशिम जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांची, विशेषतः सोयाबीन, तूर आणि कपाशीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाअभावी शेतातील सोयाबीन पीक पूर्णतः करपून गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने अपेक्षित उत्पादन मिळणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशिम आणि मंगरूळपीर या तालुक्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. एका महिला शेतकऱ्याने सांगितले की, चार एकर सोयाबीनसाठी ६० हजार रुपये खर्च करूनही पीक वाळून गेले आहे आणि शासनाकडून कर्जमाफी किंवा ५०% सूट मिळाली नाही. त्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. युवा शेतकऱ्यांनीही पालकमंत्री व कृषिमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली आहे.
Leave a Reply