• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मित्रांसोबत पीएम मोदींची धमाल! गंगटोकमध्ये खेळले फुटबॉल, केला गोल, एका उनाड दिवसांच्या फोटोंची सोशल मीडियावर क्रेझ

April 28, 2026 by admin Leave a Comment


PM Narendra Modi Football: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या सिक्कीम दौर्‍यावर आहेत. त्यांनी गंगटोकमध्ये मंगळवारी सकाळी सकाळी तरुणांच्या एका समूहासोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी तरुणाईत पंतप्रधानांचा सळसळता उत्साह दिसून आला. सध्या भाजपने पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मोदी हे प्रचार आणि सभांमध्ये व्यग्र होते. स्थानिकांशी संवाद साधत बंगाल काबीज करण्याचे त्यांचे स्वप्न या विधानसभेत पूर्ण होते का याची चर्चा होत असतानाच मोदी यांनी गंगटोक गाठले आणि तरुणाईसोबत ते फुटबॉलमध्ये रमले. त्यांनी या उनाड दिवसाचे सुंदर छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

हे सत्र ऊर्जावान ठरले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून या सुंदर क्षणाची छायाचित्र शेअर केली आहेत. गंगटोक येथील एका सुंदर सकाळी सिक्कीममध्ये आपल्या तरुण मित्रांसह फुटबॉल खेळण्यासारखं काही नाही. तरुणाईसोबतचे हे फुटबॉल सत्र अत्यंत ऊर्जावान झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी तरुणाईच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि मोदींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

4 हजार कोटींच्या विकास योजनांचे उद्धघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमचा 50 वा राज्य स्थापना दिवस आहे. या कार्यक्रमात ते सहभागी होतील. ते आज 4,000 हजार कोटी रुपयांहून अधिकच्या विकास कामांचे आणि विकास योजनांचे उद्धघाटन करतील.

Clearly, an energising football session with these youngsters! pic.twitter.com/Xc99oCylqt

— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2026

पीएम मोदींची सभा

पंतप्रधान मंगळवारी गंगटोक येथील ऑर्किडेरियमचा दौरा करतील. यानंतर ते सकाळी पालजोर स्टेडियममध्ये सुवर्ण जयंती कार्यक्रमात सहभागी होतील. या ठिकाणी ते पायाभूत विकास, संपर्क, आरोग्य सेवा, शिक्षण, वीज, शहर विकास, पर्यावरण, पर्यटन आणि कृषी क्षेत्रासारख्या विविध योजनांचे उद्धघाटन, शुभारंभ आणि कोनशिला ठेवतील. ते यावेळी जाहीर कार्यक्रमात जनतेला संबोधित करतील. यांगंगमध्ये सिक्कीम विद्यापीठाचा परिसर, चाकुंग येथे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ, सोचेयगांग येथे हेलेन लेपचा आरोग्य विद्यालय आणि ग्यालशिंग जिल्ह्यातील डेंटम प्रोफेशनल कॉलजेचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

याशिवाय , 160 विद्यालयात आयटी आधारीत विविध योजनांचे उद्घाटन ते करतील. या परिसरातील दळणवळणाला चालना देण्यासाठी सिरवानी आणि लोअर समदोंगमधील तिस्ता नदीवरील पुलाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तर किचुमुदरा येथून बिरधांग ते नामची पर्यंतच्या महामार्गाचे उद्धघाटन ते करतील.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रशियाकडून भारताला अत्यंत मोठे गिफ्ट, पुन्हा एकदा निभावली भारतासोबतची मैत्री, थेट दिले…
  • उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे 7 जबरदस्त फायदे, त्वचा राहील फ्रेश
  • कोलंबियातील 80 पाणघोड्यांचे प्राण वाचवा, अनंत अंबानी यांचं आवाहन; वनताराचा मोठा प्रस्ताव
  • Marriage in Same Gotra: एकाच गोत्रात लग्न? जीवनात खरंच येते मोठे वादळ? अडचणींचा करावा लागतो सामना?
  • 4 मिनिट 37 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ज्याने लोकांना प्रेम करायला शिकवलं, आजही वेळ काढून ऐकतात लोक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in