• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मिक्सर सतत होतोय खराब… त्यामध्ये हे पदार्थ वाटण्याची चूक कधीच करु नका

July 28, 2026 by admin Leave a Comment


पूर्वी महिला दगडी पाटा आणि वरवंट्यावर पदार्थ बारीक करयाचे. पण आता पाटा – वरवंट्याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. आज प्रत्येकाच्या घरात मिक्सर ग्राइंडर असतोच… मिक्सर ग्राइंडर हे स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक साधन आहे, जे चटणी बनवणं, मसाले वाटणं, रस बनवणं इत्यादी स्वयंपाकाची सर्व कामे घाईगडबडीत पूर्ण करण्यास मदत करतं. त्यामुळे बहुतेक लोक मिक्सरमध्ये कडक मसाले, बर्फ, भाजलेले तिखट मसाले वाटतात. पण सर्वच पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नयेत. विशेषतः, यापैकी काही पदार्थ मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटल्याने मिक्सरच्या मोटरचं आणि ब्लेडचं नुकसान होते. त्यामुळे जर तुम्हाला मिक्सर जास्त काळ टिकवायचा असेल, तर हे पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नका.

मिक्सरमध्ये कोणत्या गोष्टी वाटू नयेत?

गरम खाद्यपदार्थ: गरम मसाले, सूप बनवण्यासाठी शिजवलेल्या भाज्या इत्यादी गरम असतानाच मिक्सरमध्ये दळू नयेत. कारण, या गरम पदार्थांमुळे ब्लेडमध्ये दाब निर्माण होतो. यामुळे झाकण अचानक उघडू शकतो. तसेच, गरम पदार्थ वारंवार दळल्याने मिक्सरचा ब्लेड आणि मोटर या दोन्हींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून, गरम पदार्थ थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये दळावेत.

बर्फाचे तुकडे: ज्युसिंग करताना, बर्फाचे तुकडे टाकून ब्लेंडरमध्ये बारीक केले जातात. जास्त बर्फाचे तुकडे टाकल्याने ब्लेडवर अचानक दाब येतो, ज्यामुळे केवळ ब्लेडचेच नुकसान होत नाही, तर मोटरवरही ताण येतो.

कडक मसाले: आजकाल बाजारात भेसळयुक्त मसाल्यांच्या पावडर मिळत असल्यामुळे लोक घरीच मिरची पावडर आणि हळद पावडर बनवत आहेत. पण कडक मसाले मिक्सरमध्ये दळू नयेत. हळद, जायफळ आणि दालचिनी यांसारखे कडक मसाले दळल्याने जार ब्लेडला नुकसान पोहोचू शकते. हे मसाले एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दळल्याने मोटरवर ताणही येऊ शकतो.

सुके पदार्थ: मोठ्या प्रमाणात बदाम, काजू किंवा इतर सुका मेवा पाण्याशिवाय दळल्याने मोटरवर अतिरिक्त ताण येतो. तसेच, तांदूळ, गहू, बाजरी इत्यादी धान्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात टाकल्याने मशीनवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे मिक्सर ग्राइंडरच्या मोटरची वेळेआधीच झीज होऊ शकते.

सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी टीप्स म्हणजे, मिक्सरच्या भांड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भांडी भरू नका. ही एक सामान्य चूक आहे जी बरेच लोक करतात. असे केल्याने मिक्सरच्या कार्यक्षमतेत घट होईल आणि मोटर व ब्लेडचं नुकसान होईल.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in