• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मासिक पाळीत रात्री शंकराच्या मंदिरात गेलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडलं तरी काय? म्हणाली, ‘महादेवाच्या समोर गेले अन्’

June 21, 2026 by admin Leave a Comment


Marathi Actress on Period : मासिक पाळी (Menstruation) ही प्रत्येक महिलेच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण मासिक पाळीबद्दल आपल्या समाजात अनेक गोष्टी मानल्या जातात, जसं की मंदिरात जायचं नाही, देवाची पूजा करायची नाही. एवढंच नाही तर, अनेक जण महिलेला बेडवर देखील बसू देत नव्हते… पण असंख्य लोक असे आहेत, जे या गोष्टी मानत नाही. मासिक पाळीबद्दल फक्त गैरसमज आहे, असं म्हणतात. पण पूर्वीपासून परंपरा सुरु असल्यामुळे अनेकांच्या मनात भीती देखील असते… अशात एक मराठमोळ्या अभिनेत्रीने मासिक पाळीत शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर काय घडलं याबद्दल सांगितलं आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे.

ज्या अभिनेत्रीने मासिक पाळीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्वेता अंबिकर आहे… श्वेता हिने नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये पीरिअड्स सुरु असताना शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर काय अनुभव आला याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री श्वेता अंबिकर म्हणाली, ‘माझे पीरिअड्स सुरु होते. त्या दिवशी नाईट शिफ्ट होती आणि मला दुपारीच पीरिडस आले… त्या वेळी मला काहीच करता येऊ शकत नव्हतं… पीरिअड्स असताना मी मंदिरात गेली कारण शूटिंग करायचं होतं… वाईला मी शूट करत होते.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पीरिअड्स आल्यामुळे मी आत जाऊ शकत नव्हती. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मला कुढे हात लावायचा नव्हता आणि कोणती पूजा देखील करायची नव्हती… मला फक्त माझे सीन करायचे होते. मग मंदिरात गेल्यानंतर मी महादेवाला फक्त एवढंच म्हणाले की, आज माझए पीरिअडस् आले आहेत, पण हा माझ्या कामाचा भाग आहे… त्यामुळे येथे येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.’ असं म्हणत अभिनेत्रीने महादेवाची माफी मागितली.

श्वेता अंबिकर हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अशोक मा.मा’. ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘बाजी’ मालिकेत देखील श्वेता हिने काम केलं आहे. पण ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in