• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर…चौकशीचा फास आवळला!

June 8, 2026 by admin Leave a Comment


Malegaon Minor Delivery Case: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एका खासगी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती करण्यात आली तसेच नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात किशोर डांगे यांच्यासह एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता याच प्रकरणाती चौकशी केल्यानंतर किशोर डांगे हे BUMS डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनही सक्रीय झाले आहे.

डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध पॉक्सो आणि बेकायदेशीर प्रसूतीसंदर्भातील गु

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले डॉ.किशोर डांगे हे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक होते. हिराई या खाजगी रुग्णालयात एका अल्पवयीन गर्भवती मुलीची प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात दोन नामवंत डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध पॉक्सो आणि बेकायदेशीर प्रसूतीसंदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकाची विक्री केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून शहरात संतापाची लाट पसरली आहे.

डॉ.किशोर डांगे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त

मिळालेल्या माहितीनुसार हिराई हॉस्पीटल हे डॉक्टर किशोर डांगे यांचे असून या बाबतीत आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. हिराई हॉस्पीटलचे मालक डॉ.किशोर डांगे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गर्भलिंग निदान, गैर मार्गाने अबॉर्शन करणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. तसेच आम्हाला प्रत्यक्ष अवैध प्रसूती व बालकाची विक्री करण्याचे रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांची संपर्क साधून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

चौकशी समिती स्थापन

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. बोगस डॉक्टर संदर्भात सबळ पुरावे मिळणे आवश्यक आहे. बोगस डॉक्टर संख्या कमी करणे, अवैध गर्भपात संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असे, मालेगावचे आरोग्य अधिकारी जितेंद्र डोलरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात या प्रकरणात नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in