
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नाव कोणाला माहिती नाही? जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लोक देशाची सर्वात कठीण परीक्षा जेईई अॅडव्हान्स देतानाही मागे पुढे पाहात नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कळाले की मायक्रोसॉफ्टमध्ये लाखोंचा पगार घेणारा माणूस ऑटो रिक्षा चालवत आहे, तर तुम्ही काय म्हणाल? अर्थातच तुम्ही शॉक व्हाल आणि डोक्याला हात लावाल. पण जग विचित्र लोकांनी भरलेले आहे. ज्याच्याकडे ऑटो रिक्षा आहे तो लाखोंच्या कमाईचे स्वप्न पाहतो आणि ज्याच्याकडे लाखो आहेत तो ऑटो चालवत आहे. चला, जाणून घेऊया रिक्षा चालवणाऱ्या एका माणसाची कथा…
देशाच्या आयटी हब बंगळुरूमध्ये एकाहून एक आयटी कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांवर पाण्यासारखा पैसा उधळतात आणि त्यांना कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजने सन्मानित करतात. पण या सर्वांमध्ये एकाकीपणा दूर करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचा एक अभियंता कंपनीत फुल टाइम जॉब केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी ऑटो चालवतो. असा दावा आहे की तो हे सगळं आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी करतो. पण यामागील सत्य काही वेगळे आहे.
एक व्यक्ति बेंगलुरु में एक ऑटो में चढ़ा तो कुछ दूर चलने के बाद उसकी नज़र ऑटो ड्राइवर पर गई, उसने देखा कि
ऑटो ड्राइवर Microsoft की जर्सी पहने हुए है, उस व्यक्ति से रहा नहीं गया तो उसने ऑटो ड्राइवर से पूछ लिया कि भाई ये T-shirt किसकी पहने हो?
तो ऑटो ड्राइवर ने जवाब दिया कि मेरी… pic.twitter.com/2S2dlP0Fat
— Malang (@Malanggav4) September 3, 2026
मायक्रोसॉफ्टचा हुडी घालून ऑटो चालवत होता माणूस
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आला होता की हा ऑटो ड्रायव्हरने मायक्रोसॉफ्टचा हुडी घातला आहे तो कंपनीकडून लाखो रुपयांचा पगार घेतो तरीही एकाकीपणा दूर करण्यासाठी ऑटो चालवतो. पण खरंतर ऑटो चालक वेंकटेशने एकाकीपणाबाबत बोलत आयटी कंपन्यांवर टोमणा मारला होता.
पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की माणूस मायक्रोसॉफ्टमध्ये स्टाफ सॉफ्टवेअर या पदावर कार्यरत आहे. पण एका यूजरने त्याचा हा विनोद पकडला आणि म्हटले की, “मात्र मायक्रोसॉफ्टमध्ये स्टाफमध्ये स्टाफ सॉफ्टवेअरसारखे कोणतेही पदच नाही.” यानंतर त्यानेही स्पष्ट केले की असे कोणतेही पद खरोखर नाही, त्यांचा हा दावा केवळ विनोद आणि टोमण्याचा होता.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत, ‘एकाकीपणा खरोखरच चिंतेचा विषय आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, एकाकीपणासाठी कोणी रात्री रिक्षा का चालवेल असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Leave a Reply