• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माफ करा! पत्रकारांना धमकावल्यानंतर आता संजय दिना पाटलांची दिलगिरी; हात जोडून म्हणाले…

June 25, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Dina Patil : ठाकरे गटाला सोडून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढे आलात तर मारून सोडतो, असे संजय दिना पाटील म्हणाल्याची व्हिडीओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत आपली नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राज्यभरात संजय दिना पाटील यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता संजय दिना पाटील यांनी समोर येऊन घडलेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली आहे.

मी अपमान सहन केला

संजय दिना पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून पत्रकार बांधवांची माफी मागितील आहे. माझ्याकडून चुकीचे शब्द वापरले गेले, असे संजय दिना पाटील म्हणाले आहेत. माझ्यात आणि पत्रकारांमध्ये जो प्रकार झाला त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हा प्रकार का घडला ते सांगतो. मी ज्या दिवसापासून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या दिवसापासून मला शिवीगाळ करून माझा अपमान केला जात आहे. मी अपमान सहन केला. तरीसुद्धा आज सकाळी काही पत्रकार मित्र आले होते. मला माझ्या पक्षप्रवेशबद्दल काहीही विचारू नका. मला जे काही बोलायचे होते, ते बोलून झालं आहे. कृपा करून काही बोलू नका, अशी विनंती मी त्यांना हात जोडून केली, असे सुरुवातीला संजय दिना पाटील यांनी सांगितले.

पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो

तसेच, शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय माझा आहे. मला शिव्या दिल्या जात आहेत. परंतु माझ्या परिवाराल जे वाईट बोललं जात आहे, ते चुकीचे असून माझ्या कुटुंबाला लांब ठेवा, अशी विनंती मी केली. परंतु तरीदेखील आज सकाळी पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट गोष्टी सांगण्यात आल्या. खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. याबाबतच पत्रकार विचारायला आले होते. मी विनंती करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकार थांबले नाहीत. नंतर वाद वाढत गेला. माझ्याकडून काही चुकीचे अपशब्द वापरण्यात आले. त्यासाठी त्या पत्रकारांची तसेच पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. तसेच आता कृपा करून मी शिवसेनेत जो प्रवेश केला आहे, त्यावर टीका केली तरी हरकत नाही. परंतु माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवावे अशी विनंतीही त्यांनी केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in