• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महेश कोठारेंच्या बुक लॉन्चनंतर नेमकं काय झालेलं, उर्मिला – आदिनाथ यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय? 2022 नंतर तर…

July 17, 2026 by admin Leave a Comment


URMILA KANETKAR ADINATH KOTHARE DIVORCE REASON : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटानंतर दोघांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची जाहिर कबुली दिली. लग्नाच्या तब्बल 15 वर्षांनंतर दोघांचं घटस्फोट झालं असून, परस्पर सहमतीने घटस्फोट घेतोय, पती – पत्नी म्हणून आमचं नातं संपत असलं तरी, मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही कायम एकत्र असू… असं पोस्टमध्ये दोघांनी म्हटलं आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा तर रंगतच होत्या. पण सर्व चर्चांमागे नेमकं कारण काय होतं? असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल.

अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्यामध्ये नेमकं काय बिनसलं?

रेडिटवर एका नेटकऱ्यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. महेश कोठारे यांच्या ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. उर्मिला हिचा पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आदिनाथ याने उर्मिला हिला प्रपोज केला. त्यानंतर दोन वर्षांत दोघांनी लग्न देखील केलं. 2017 मध्ये उर्मिला हिने गोंडल लेक जिजा हिला जन्म दिल. पण 2022 पासून उर्मिला आणि आदिनाथ यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांनी जोर धरला…

2022 पूर्वी उर्मिला आणि आदिनाथ एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे. मुलीसोबत देखील दोघांचे फोटो व्हायरल झाले. पण त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र कधीच दिसले नाहीत, शिवाय सोशल मीडियावर दोघांनी फोटो पोस्ट करणं देखील बंद केलं. त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागल्याची माहिती समोर आली. अखेर दोघांमध्ये असं काही घडलं की उर्मिला लेकीसोबत वेगळी राहू लागली. त्यानंतर उर्मिला फक्त लेकीसोबत फोटो पोस्ट करु लागली.

महेश कोठारेंच्या बुक लॉन्चनंतर नेमकं काय झालं?

मुलीसोबत वेगळी राहू लागल्यानंतर उर्मिला हिने पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. कधीकाळी कोठारे प्रॉडक्शनची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या उर्मिला हिने दुसऱ्याच प्रॉडक्श हाऊसमधून काम करण्यास सुरुवात केली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिलाने नव्याने सुरुवात केली. एवढंच नाही तर, एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं देखील दोघांनी बंद केलं.

त्यानंतर महेश कोठारे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या उदघाटनाला उर्मिला हजर होती. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम लागला. पण त्यानंतर उर्मिला आणि आदिनाथ कधीच एकत्र दिसले नाहीत. आता अखेर 2026 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. दोघांच्या या टोकाच्या निर्णयानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे… पण दोघांनी एवढा मोठा निर्णय का घेतला यावर अधिकृत भाष्य अद्यापही केलेलं नाही.

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
  • नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट, PM मोदींचा थेट बालेन शाह यांना फोन; नेमकी चर्चा काय?
  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in