
आपल्या भोवती अशा काही घटना घटत असतात, ज्यामुळे मन सुन्न होतं. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते एका पातेल्यात शिजवण्यात आले. एवढंच नाही तर, उर्वरित तुकडे एका सुटकेसमधून भरून, ती सुटकेस एका ट्रेनमध्ये ठेवण्यात आली. पण त्याच सुटकेसने पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचवलं. संबंधित घटना चेन्नई येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती – पत्नीने मिळून एका महिलेची हत्या केली केली आणि तिच्या शरीराचे काही तुकडे पातेल्यात काही भाज्यांसोबत शिजवले. तर राहिलेले तुकडे एका सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस ट्रेनमध्ये ठेवली. त्यानंतर आग्रा रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हाती सुटकेस लागल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. या धक्कादायक घटनेच्या तपासासाठी पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात आलेलं. त्यानंतर पती – पत्नीला मणिपूर येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथून आग्रा येथे आलेल्या ट्रेनमध्ये पोलिसांनी एका सुटकेस मिळाली. सुटकेस उघडून पाहिल्यानंतर, त्यामध्ये शारीराचे तुकडे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सुटकेस ताब्यात घेतली. पण त्यामध्ये एक अशी गोष्ट होती, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत झाली. सुटकेसमध्ये एक पिशवी होती, ज्यावर चेन्नई असं लिहिलं होत. एवढंच नाही तर, पिशवीवर एका टेक्सटाईल कंपनीचं नाव देखील लिहिलं होतं.
याच एका पुराव्यामुळे पोलीस तामिळनाडू येथून चेन्नईपर्यंत पोहोचले. जवळपास 350 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना एक संशयास्पद जोडपं दिसलं. फुटेजच्या माध्यमातून कळलं की, त्या पती – पत्नीने सुटकेस ट्रेलमध्ये ठेवली आणि तेथून पळ काढला.
एका अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट
मृत महिलेची ओळख हैथून निशा अशी झाली आहे. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, हैथून निशा हिची ओळख माणिक लस्कर याच्यासोबत झाली. दोघे एकाच ठिकाणी काम करत होतं. अशात दोघांमध्ये प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली. दोघांच्या नात्याबद्दल माणिक याची पत्नी भागमती माझी हिला कळलं. यानंतर वाद वाढत गेले आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक आणि भागमती यांनी मिळून हैथून निशा हिची हत्या केली.
हत्येनंतर, त्या दोघांनी मृतदेह विल्हेवाटीस लावण्याचा आणि प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग्रा रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एका सुटकेसमुळे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.
दोन्ही आरोपी मणिपूरमध्ये लपून बसले होते
गुन्हा केल्यानंतर, आरोपी पती – पत्नी चेन्नईतून पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आणि तपासादरम्यान ते दोघेही मणिपूरमध्ये लपून बसल्याचं निष्पन्न झालं. या माहितीच्या आधारे, एका विशेष पथकाने सर्वप्रथम मणिपूरमध्ये ओडिशामधील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय माणिक लस्करला अटक केली. त्यानंतर, पोलिसांनी त्याची पत्नी भागमती माझी हिलाही ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply