• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांना दरवर्षी सरकारकडून मिळणार 30 हजार, मोठी घोषणा, 1 ऑगस्टपासून करता येणार अर्ज, दिल्ली सरकारने..

July 29, 2026 by admin Leave a Comment


देशभरात महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत. यादरम्यानच आता महिलांसाठी अजून एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली. महिलांना वर्षाला सरकाकडून तब्बल 30 हजार रूपये मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला 2500 रूपये मदत म्हणून महिलांना दिले जातील. ही मोठी घोषणा महिलांसाठी दिल्ली सरकारने जाहीर केली. घरगुती खर्च, वैयक्तिक गरजा आणि भविष्यातील बचत याकरिता महिला या रक्कमेचा वापर महिला करू शकतात. विविध राज्यात महिलांसाठी अशाप्रकारच्या योजना आणल्या जात आहेत. या योजनेसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला अर्ज करू शकतात. या योजनेकरिता सरकारने स्वतंत्र बजेट ठेवले आहे. 5110 कोटीचे बजेट जाहीर करण्यात आले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी निवडणुकीवेळी दिलेले वचन पूर्ण केले. रक्षाबंधनपर्यंत 17 लाख महिलांना या योजनेचा फायदा द्यायचा आहे.

महिलांना फक्त मदतच नाही तर त्यांची भविष्यात बचत व्हावी, याकरिता ही मदत दिली जातंय. या योजनेसाठी काही अटी सरकारकडून ठेवण्यात आल्यात. त्यात 21 ते 60 वयाच्या महिला अर्ज करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी पाहिजे. एका घरातील फक्त एकच महिला या योजनेचा फायदा घेऊ शकते.

यासोबतच सर्वात महत्वाची अट म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणारी महिला किंवा तिचा पती किंवा आई वडील कमीत कमी दहा वर्ष दिल्लीतील निवासी असावेत. घरातील एकही सदस्य जीएसटी भरणारा नसावा. यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे तीनपेक्षा जास्त मुले असलेली महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. जे कुटुंब 2400 पेक्षा जास्त यूनिट वीज वापरते, त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.

ज्या कुटुंबाकडे चारचाकी गाडी आहे आणि अगोदरच सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तरीही ती महिला योजनेसाठी पात्र नसणार आहे. सरकारी कर्मचारी, पेंन्शनधारक, आयकर आणि जीएसटी देणाऱ्या महिला देखील योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत. महाराष्ट्र शासनानेही राज्यातील महिलेसाठी लाडकी बहीण योजना आणली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in