• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाविकास आघाडीला बसणार जबर धक्का? राज्यात पुन्हा मोठा खेळ? महायुतीच्या गोटातून मोठी बातमी

July 13, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 झाली असून, राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट खासदारांच्या संख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा ठरला आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरनंतर आता शिवेसना शिंदे गटाच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने दावा केला जात आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक देखील आमच्या संर्पकात आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन टायगर 3.0  सुरू झाल्याचं म्हटलं होतं. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. उदय सामंत यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश हे सातत्याने सुरूच राहणार आहात,  अनेक नगरसेवक , माजी आमदार, माजी खासदार जमलं तर महाविकास आघाडीतील काही आमदार सगळे आमच्या सोबत यायला तयार आहेत.  त्यामुळे अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. ऑपरेशन वन, टू, थ्री वर आम्ही थांबणार नाही. अजून भरपूर ऑपरेशन व्हायची आहेत, असं सूचक विधान सामंत यांनी केलं आहे. सामंत यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विनायक राऊत प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत यांच्या हा घरातला विषय आहे.  त्यांनी आणि संबंधित व्यक्तीने या संदर्भातील खुलासा दिला आहे. त्यांचा हा कौटुंबिक विषय कोर्टामध्ये आहे. त्याचं मी राजकीय भांडवल करू इच्छित नाही, माझ्यावरती संस्कार आहेत, जे काही असेल त्यावर पोलीस योग्य कारवाई करतील असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..
  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in