• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महागाईचा सामान्य जनतेवर ‘सायलेंट अटॅक’, 15 दिवसांत ‘या’ वस्तूंच्या दरात मोठी वाढ, यादी पाहून झोपच उडेल

June 16, 2026 by admin Leave a Comment


Products Price Hike: दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे. पेट्रोल – डिझेलाच्या दरवाढी नंतर सिलेंडरच्या दराच देखील मोठी वाढ झाली. गॅस सिलेंडरच्या दरात होणारे दर दिसून आले. पण गेल्या 15 दिवसांत, अन्य वस्तूंचे दर देखील वाढले आहे, ज्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर सायलेंट अटॅक केला आहे. पण कोणत्या वस्तूंवर किती रुपयांनी वाढ झाली आहे, याबद्दल कदाचित कोणाला अंदाज देखील आला नसेल. तर जाणून घ्या गेल्या 15 दिवसांपासून कोणत्या वस्तूंवर किती वाढ झाली आहे, जी खरंच हातावर पोट असणाऱ्यांसाठी फार मोठी आहे.

FMGC प्रोडक्ड्सचे वाढले दर…

कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली असून, पॅकेजिंग कॉस्टमध्ये थेट 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. झालेल्या दर वाढीनंतर, HUL, डाबर, मॅरिको आणि कोलगेट यांसारख्या देशातील दिग्गज FMGC कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्टमध्ये मोठी वाढ केली आहे. डिटर्जंटच्या किमतीतही 5 ते 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाईच्या या काळात ओरल केअर आरोग्याशी संबंधित उत्पादनेही महाग झाली आहेत; कोलगेटपासून ते डाबरपर्यंतच्या कंपन्यांनी त्यांच्या अनेक टूथपेस्ट उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

डेयरी प्रॉडक्ट्समध्ये वाढ…

अमूल गोल्डच्या 1 लिटरच्या पॅकची किंमत काही दिवसांपूर्वी वाढली असून, ती 68 रुपयांवरून 70 रुपये झाली आहे. अमूल ताजाच्या किमतीतही वाढ होऊन ती 55 रुपयांवरून 57 रुपये झाली आहे. मदर डेअरीच्या फुल-क्रीम दुधाची किंमत 69 रुपयांवरून 72 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर, मदर डेअरीच्या म्हशीच्या दुधाच्या दरात 5 रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्याची किंमत प्रति लिटर 75 रुपयांवरून 80 रुपये झाली आहे.

याचदरम्यान, भाज्यांच्या दरांत देखील मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो गेल्या 15 दिवसांमध्ये 30 – 40 रुपयांवरून थेट 60 – 70 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांदे, अदरक, हिरवी मिर्ची, लिंबू यांचे दर देखील वाढले आहेत. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यामुळे, बाटाटे, वांगी आणि भेंडीच्या दरात देखील 5 – 10 रुपयांची वाढ झाली आहे.

बाहेरचे पदार्थ देखील महागले…

कमर्शियल एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समधील खाद्यपदार्थ व पेयांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. या वस्तूंसाठी महागाईचा दर 5.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादन खर्च भरून काढण्याच्या उद्देशाने, रेस्टॉरंट मालकांनी गेल्या महिन्यात मेनूवरील दरांमध्ये 1.8 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आरारारा खतरनाक.. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने कमावला तब्बल इतका नफा
  • मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब… राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
  • Operation Tiger | दिल्ली ते मुंबई…ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
  • Sanjay Raut: त्यांच्या घरात बॉम्ब… संजय राऊत यांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब, मुंबई पोलिस आयुक्तांकडे ती गंभीर तक्रार
  • पोलिसांसमोर सिया गोयल हिने उघड केले मोठे गुपित, पोलिसही चक्रावले, थेट केतन अग्रवाल याच्या..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in