• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महागाईचा मोठा दणका! थेट तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ, तब्बल इतके रूपये..

June 16, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत होते. होर्मुज खाडी बंद होती. ज्यामुळे एलपीजीसह कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाला. ज्यानंतर आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले. देशात देखील पुढील काही दिवसात पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या भाव कमी होईल असा अंदाज आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजार अस्थिर झाला आणि कच्च्या तेलाचे भाव सतत वाढत होते. केंद्र सरकारने देखील यादरम्यान मोठे निर्णय घेत थेट पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये चाैथ्यांना वाढ केली. त्यानंतर आता सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता असतानाच मोठा दणका बसला आहे.

इराण आणि अमेरिका युद्धानंतर पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस आणि सीएनजीच्या दर कमी होण्याचा अंदाज असतानाच मोठा दणका बसला. थेट तिसऱ्यांना सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली. प्रतिकिलो सीएनजीच्या किमतीमध्ये तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली. सीएनजीसाठी 95.75 रूपये मोजावे लागणार आहेत. 8 मे रोजी प्रतिकिलो दीड रूपयांनी वाढ सीएनजीच्या दरात करण्यात आली होती.

त्यानंतर 28 मे रोजी अडीच रूपयांनी वाढ झाली. घरगुती पीएनजीमध्येही 85 पैशांनी वाढ करण्यात आली. पीएनजीचा दर आता 51.50 रूपये झाला. पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण, हिंजवडी या भागात ही वाढ करण्यात आली. ज्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसणार आहे. एकीकडे सामान्य लोक युद्धानंतर दरवाढ कमी होण्याची अपेक्षा करत आहेत, तर दुसरीकडे मोठा दणका बसत आहे.

महागाईचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना नैसर्गिक वायू दरवाढीचा फटका बसणार आहे. पुणे परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)च्या दरात 1 रुपयाची आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली. त्यामुळे वाहन चालकांना आता सीएनजीसाठी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर घरगुती ग्राहकांना पीएनजीसाठी प्रति मानक घनमीटर 51 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in