• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला हिणवू नका रे… ओमराजे निंबाळकर यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल, मोठी खळबळ, थेट..

July 1, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ज्याने खळबळ उडाली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने सर्वांनाच धक्का बसला. धाराशिव जिल्ह्यात आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत. सोशल मीडियावरही ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर मोठा फटका बसला. सतत त्यांची फॅन फॉलोइंग कमी होताना दिसली. यादरम्यानच आता सध्या एक ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात थेट तुम्ही खासदार निवडन दला की लाईनमन? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या व्हायरल ऑडिओ क्लिपची तूफान राज्यभरात चर्चा होत आहे. शिवसेनेत प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी एका कार्यकर्त्याचा फोनवरील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ज्यात कार्यकर्त्याने म्हटले की, मला दुसऱ्या जिल्ह्यातून फोन आला… तुम्ही खासदार निवडून दिलाय की लाईनमन? असा मला प्रश्न त्यांनी विचारला. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, मला लाईनमन म्हणून हिणवू नका… असे उत्तर दिल्याची ऑडिओमध्ये रेकॉर्डिंग झाले. ज्यात ओमराजे निंबाळकर स्वत: म्हणत आहेत की, मला लाईनमन म्हणून नका हिणवू..

डीपीसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या मुद्द्यावरूनही कार्यकर्ता आणि खासदार ओमराजे यांच्यामध्ये संवाद झाला. सदर ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. पण हा ऑडिओ क्लिप चर्चेचा विषय बनली आहे. ठाकरे गटाची साथ सोडताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, मला लोकांची कामे करता येत नाही. लोक माझ्याकडे कामे घेऊन येतात. पण मी त्यांची मदत करू शकत नाही.

ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडताना लोकांच्या मदतीला पडण्यासाठी आणि मतदार संघातील विकासासाठी बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आता ओमराजे निंबाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे सोपू शकतात. मंंत्रिपद ओमराजे निंबाळकर यांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र, यादरम्यानच काही लोक थेट ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात असल्याचेही बघायला मिळतंय.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे..
  • आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना
  • Todays Gold Rate: वाह! सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे भाव पुन्हा घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी
  • कोण होत्या विजया मेहता? ज्यांनी विजय तेंडुलकरांपासून नाना पाटेकरांपर्यंत अनेकांना दिलं व्यासपीठ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in