• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला माझ्या वडिलांची प्रचंड तिरस्कार, कारण ते एक पुरुष आहेत.. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील महिलेचा धक्कादायक व्हिडीओ, थेट..

July 19, 2026 by admin Leave a Comment


समय रैना याचा शो इंडियाज गॉट लेटंट 2 पुन्हा एकदा चर्चेत आला असून वाद वाढताना दिसत आहे. चक्क या शोमध्ये एक महिला स्पर्धेक सहभागी झाली आणि तिने जे आपल्या वडिलांबद्दल विधान केले त्याने खळबळ उडाली. ती स्वत:ला मॅन हेडर्स म्हणते. तिला पुरूषांचा प्रचंड तिरस्कार आहे. तिने तिच्या भावना या शोमध्ये व्यक्त केल्या. आपले वडील आणि भावालाही तिने सोडले नाही. यात धक्कादायक बाब म्हणजे चक्क ती एक शिक्षिका आहे. परीक्षकांनाही तिचे हे बोलणे अजिबात पटले नाही. तिचा पुरूषांबद्दलचा व्देश सर्वांसाठीच हैराण करणारा होता. आता तोच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. परीक्षकांनी तिच्या या विधानावर तिला थेट शून्य गुण दिले. स्पर्धेमधील ती एकमेंव स्पर्धेक आहे, जिला शून्य गुण मिळाली आहेत.

सोशल मीडियावरही लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. इंडियाज गॉट लेटंट 2 मध्ये सहभागी झालेल्या साक्षी झा हिने केलेल्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील परीक्षकांनाच नाही तर साक्षीच्या विधानाने सर्वांनाच धक्का बसला. साक्षीच्या मनात तिचे वडील, भाऊ आणि आजोबा यांच्याबद्दल मोठा व्देष आहे. साक्षी म्हणाली की, पुरूषांबद्दल माझ्या मनात मोठी जखम आहे, जी पिठ्यांपासून चालत आली.

मला माझ्या वडिलांचाही तिरस्कार वाटतो. मला मान्य आहे की, ते माझे वडील आहेत. पण ते एक पुरूष आहेत. माझे आजोबा पण तसेच होते. त्यांना वाटते की, स्त्री या काहीच करू शकत नाहीत. स्वयंपाक करा या गोष्टीसाठी त्यांचा आग्रह होता. माझा ते व्देष करायचे. माझा भाऊ म्हणजे त्यांचा नातू त्यांच्या जवळचा. साक्षी झा हिने केलेल्या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अनेकांनी साक्षी झा हिच्या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, ही मानसिक रूग्ण आहे. हिला काहीतरी गंभीर आणि मोठा आजार असावा. आपल्या वडिलांबद्दल कोण असे विधान करू शकते म्हणत लोक मोठ्या प्रमाणात व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यासोबतच तिने म्हटले की, मलाही माझ्या नवऱ्याला बेल्टने मारायचे आहे. तिच्या या बोलण्याने सर्वांच धक्का बसला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in