• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला खुश ठेवलंस तर… बॉसने मर्यादा ओलांडल्या; विमा कंपनीतील धक्कादायक प्रकाराने पुणे हादरले

June 5, 2026 by admin Leave a Comment


पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण करायला जायच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्याला लोणावळ्याला नेऊन तिचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित विमा कंपनीत हा प्रकार घडला आहे. या महिला कर्मचाऱ्याने आपल्या एरिया मॅनेजरवर लैंगिक छळ, अश्लील वक्तव्ये, जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न आणि नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 74, 75, 78 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला कंपनीमध्ये सीनियर असोसिएट म्हणून कार्यरत असून विमा कंपनीच्या हिंजवडी आणि वाकड शाखांमध्ये विमा व्यवसायाचे काम पाहते. या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत धक्कादायक माहिती दिली आहे. जानेवारी 2026 मध्ये हिंजवडी शाखेत रुजू झाल्यानंतर संशयित आरोपी आणि कंपनीचा एरिया मॅनेजर मोहम्मद सादिक हा वारंवार वैयक्तिक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. कामाच्या संदर्भात तिने टीम लीडरकडे रिपोर्ट करणे अपेक्षित असतानाही सादिक वारंवार फोन करून माझ्याकडून रिपोर्ट घेत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

चर्चेला बोलावलं…

तक्रारीनुसार, हिंजवडी शाखा घरापासून लांब असल्याने तिने भोसरी शाखेत बदली मिळू शकते का? याबाबत सादिक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर 19 मे 2026 रोजी व्यवसायातील कामगिरीबाबत चर्चा करण्यासाठी तिला औंध येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात बोलावण्यात आले. चर्चा संपल्यानंतर रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ती बसची वाट पाहत उभी असताना सादिक हा कार घेऊन तेथे आला आणि घरी सोडण्याचा आग्रह केला.

मला नाराज करणाऱ्यांना…

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने नकार दिल्यानंतरही तिला कारमध्ये बसण्यास भाग पाडण्यात आले. प्रवासादरम्यान सादिक यांनी तिच्याशी सूचक आणि अश्लील स्वरूपाचे संभाषण केले. “आपल्या दोघांमध्ये काही झाले तरी कोणाला कळणार नाही”, “मला नाराज करणाऱ्याला मी सिस्टीममधून बाहेर काढतो” अशा प्रकारची वक्तव्ये केल्याचा आरोप तिने केला आहे. कार लॉक असल्याने मध्ये उतरता आले नाही, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. घरी सोडताना “ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, अन्यथा तुझ्यासाठी चांगले होणार नाही” अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हात हातात घेतला

यानंतर 29 मे रोजी सादिक यांनी ग्राहकाला भेटायचे असल्याचे सांगून तिला सोबत येण्यास सांगितले. तक्रारीनुसार, हिंजवडीहून दोघे लोणावळा महामार्गावरील एका ढाब्यावर गेले. प्रवासादरम्यान सादिकने “कॉर्पोरेट क्षेत्रात बॉसला कसे खुश ठेवायचे हे माहीत असले पाहिजे, तू मला खुश ठेवलेस तर तुला पैशांची चिंता करावी लागणार नाही,” असे वक्तव्य केल्याचा आरोप तिने केला आहे. याचवेळी त्यांनी तिचा हात जबरदस्तीने हातात घेतल्याचेही महिलेने म्हटले आहे.

तू खूप बोअरिंग…

ढाब्यावर पोहोचल्यानंतर सादिक यांनी तिला ड्रिंक घेण्याचा आग्रह केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तिने नकार दिल्यानंतर “तू खूप बोअरिंग मुलगी आहेस” असे म्हणत लोणावळ्यात ट्रेकिंगला जाऊ, जंगलात एकांतात फिरू आणि मजा करू, अशा प्रकारचे प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तत्काळ आपल्या मावसभावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कंपनीतील इतर अधिकाऱ्यांपर्यंतही ही माहिती पोहोचली. कुटुंबीयांना प्रकार समजल्याचे लक्षात आल्यानंतर सादिकने तिला तातडीने परत पुण्यात आणल्याचा दावा करण्यात आला आहे.

परतीच्या प्रवासात “अशा गोष्टी घरच्यांना सांगायच्या नसतात. जर तू कोणाला काही सांगितले तर तुला कंपनीत काम करू देणार नाही आणि कुठेही नोकरी करण्याच्या लायकीची ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्याच दिवशी ती आपल्या भावांसह कंपनीच्या कार्यालयात गेली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. कंपनीकडून अंतर्गत चौकशीचे आश्वासन देण्यात आले; मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर तिने हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेत कायदेशीर तक्रार दाखल केली.

तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. दरम्यान, तक्रारीतील आरोपांवर मोहम्मद सादिक किंवा संबंधित कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मोहम्मद ऊर्फ जाफर सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपी व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिला कर्मचाऱ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सय्यद हा कामाच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळीही महिलेला फोन करून अशोभनीय व वैयक्तिक संभाषण करत असे. तसेच, तो पीडितेला जेवणाच्या बहाण्याने लोणावळा येथे घेऊन गेला होता. तिथे त्याने पीडितेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला होता. दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मोहम्मद ऊर्फ जाफर सय्यद याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तो कोणाचा खून… चेतनच्या काकांनी दिली महत्त्वाची माहिती; सियाबद्दलही मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
  • एक गिफ्ट द्या..! विराट कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची जबरदस्त क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्री
  • तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी रूपये तयार, इंटरनॅशनल ड्रग लॅाबीचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
  • बच्चू कडू यांना जबरदस्त लॉटरी, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट?
  • Weather Update : अल निनोचा धोका टळला? राज्यात पाऊस कसर भरून काढणार, आएमडीकडून या वर्षीचा सुधारीत अंदाज जारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in