• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑफर दिली होती… रवी राणा यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; महायुतीत काय चाललंय?

June 9, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. आमदार रवी राणा हे गेल्या काही काळापासून भाजपच्या सोबत आहेत. अशातच आता रवी राणा यांनी आपल्याला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर आल्याचे विधान केले आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवनीत राणा राज्यसभेवर गेल्या असत्या…

रवी राणा यांनी म्हटले की, राज्यसभेची जागा सुनेत्रा पवार यांची होती, ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असती तर नक्कीच नवनीत राणा राज्यसभेवर गेल्या असत्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निश्चित केलं होतं. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी खऱ्या अर्थाने नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून फॉर्म भरावा अशी अट टाकली होती, त्यांच्या भावना चांगल्या होत्या. नवनीत राणा राष्ट्रवादी पक्षातर्फे गेल्या पाहिजे असं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या मनामध्ये होतं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

पुढे बोलताना रवी राणा म्हणाले की, नवनीत राणा यांचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे विचार, हिंदुत्वाचे विचार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये नवनीत राणा काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहील असा निर्धार नवनीत रावांनी केला होता. भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून सातत्याने त्या विचारावर काम करून जनतेची सेवा करत आहेत. पदासाठी इकडे तिकडे उड्या मारण्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराने विचारला धरून काम केलं पाहिजे हा उद्देश हा संकल्प नेहमी नवनीत राणा यांचा आहे.

मला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑफर दिली होती – रवी राणा

रवी राणा यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने शिवसेनेमध्ये या व काम करा अशी ऑफर दिली होती. मी आधीच सांगितलं की, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून मी काम करत आहे. जोपर्यंत राजकारणामध्ये देवेंद्र फडणीस आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत सुद्धा मी ताकदीने काम करेल, मी कुठेही जाणार नाही. मी एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांचे आभार मानतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in