
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याविषयीची मुदतवाढ देण्यात आली आहे. कालावधी वाढीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या आजच्या बैठकीत वाहन परमिटचा कालावधी वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 1 मे पासून परमिट रद्द होणार नाहीत. सूत्रांनुसार, 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावर बैठकीत उपस्थित सर्वांचे एकमत झाले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply