• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कुकर नेहमी घासता, पण गृहिणींनो 3 जागा अस्वच्छ राहिल्या तर आजारपण येईल घरात

April 28, 2026 by admin Leave a Comment


स्वयंपाकघरातील कामाचा व्याप कमी करण्यासाठी आणि झटपट स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर हे प्रत्येक गृहिणीचे सर्वात जवळचे साधन असते. डाळ-भात शिजवण्यापासून ते बटाटे उकडण्यापर्यंत सर्व कामांसाठी आपण कुकरचा वापर करतो. मात्र, रोजच्या घाईगडबडीत आपण कुकर स्वच्छ करताना एक मोठी चूक करतो. कुकर केवळ साबणाने घासून तो बाहेरून चकाकणे म्हणजे त्याची पूर्ण स्वच्छता नव्हे. कुकरमध्ये अशा काही छुप्या जागा असतात, जिथे अन्नाचे कण साचून राहतात आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर तसेच गॅसच्या बचतीवर होतो.

झाकणावरील एक्झॉस्ट व्हॉल्व्ह (शिट्टीची जागा)

कुकरच्या झाकणावर एक लहान छिद्र असते, ज्यावर आपण शिट्टी बसवतो. यालाच ‘एक्झॉस्ट व्हॉल्व्ह’ असे म्हणतात. कुकरमध्ये वाफ साचल्यानंतर याच छिद्रावाटे ती बाहेर ढकलली जाते. डाळ किंवा भात शिजताना त्याचे दाणे किंवा फेस या छिद्रात अडकतो. जर हे छिद्र वेळीच स्वच्छ केले नाही, तर वाफ बाहेर पडण्यास अडथळा येतो. यामुळे कुकरमध्ये हवा कोंडली जाते आणि अन्न शिजायला दुपटीने वेळ लागतो. प्रत्येक वेळी कुकर धुताना शिट्टी काढून त्या छिद्रात पाणी जोराने सोडा किंवा एखादी बारीक काडी किंवा ब्रशच्या साहाय्याने त्यातील अन्नाचे कण बाहेर काढा.

झाकणाची कडा आणि रबरी रिंग

कुकरच्या झाकणाला फिट बसणारी रबरी रिंग ही प्रेशर तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपण अनेकदा झाकण धुतो पण रबर काढण्याची तसदी घेत नाही. रबराच्या आत अन्नाचे तेलकट अंश आणि कण साचतात. यामुळे तिथे दुर्गंधी येते आणि कालांतराने रबर सैल होतो. रबर सैल झाला की कुकरमधून वाफ बाहेर पडले. त्यामुळे शिट्टी वाजणे बंद होते. आठवड्यातून किमान दोनदा रबर काढून कोमट पाण्यात डिशवॉश टाकून तो स्वच्छ घासावा. तसेच झाकणाची ज्या कडेवर रबर बसतो, ती जागा टूथब्रशने स्वच्छ करावी.

कुकरचा तळ आणि आतील पृष्ठभाग

कुकरचा तळ हा उष्णतेच्या थेट संपर्कात असतो. अनेकदा पदार्थ शिजताना ते तळाला चिकटतात किंवा करपतात. जर तळाला करपलेला भाग तसाच राहिला, तर उष्णता भांड्यात व्यवस्थित पसरत नाही. यामुळे कुकर जास्त गरम होतो पण आतील पदार्थ कच्चाच राहतो. तसेच बाहेरच्या बाजूला काजळी किंवा क्षार साचल्यास गॅसची जास्त नासाडी होते. कुकरचा तळ नेहमी घासणीने घासून स्वच्छ ठेवावा. जर पदार्थ करपला असेल, तर त्यात थोडे पाणी आणि लिंबू टाकून उकळवावे, जेणेकरून डाग सहज निघतील.

प्रेशर कुकरची ही डीप क्लिनिंग केवळ स्वच्छतेसाठीच नाही, तर सुरक्षिततेसाठीही गरजेची आहे. व्हॉल्व्हमध्ये कचरा अडकल्यास कुकरचा स्फोट होण्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे आजच तुमच्या किचनमधील कुकरची नीट तपासणी करा.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित पवारांचा अपघात झाला त्या कंपनीच्या विमानात पार्थ पवार बसलेच कसे? पैसा कोणाचा? अंजली दमानियांचा सवाल!
  • Horoscope : असा दुर्मिळ योग कधीच येणार नाही, 28 एप्रिल रोजी 3 राशींचे आयुष्य बदलणार!
  • हे ज्याने केलं त्याच्या… धर्म विचारून हल्ला करताच पडळकर प्रचंड संतापले; केली मोठी मागणी!
  • PBKS vs RR : मार्कस स्टोयनिसचा तडाखा, राजस्थानसमोर 223 रन्सचं टार्गेट, पंजाब रोखणार?
  • विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in