• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

July 18, 2026 by admin Leave a Comment


20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, आधी तब्बल 58 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर वीस खासदार पक्षातून बाहेर पडले. या सर्व खासदारांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाता स्वंतत्र गट म्हणून अजून लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र आज अखेर लोकसभेच्या अध्यक्ष ओम बिरला यांनी मोठा निर्णय दिला आहे. या सर्व वीस खासदारांनी स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे, तसेच अधिवेशन काळात या खासदारांची वेगळी सिटिंग व्यवस्था करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तर दुसरीकडे महिनाभरापूर्वी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली होती, या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवेसना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या शिवसेना शिंदे गटातील विलिनीकरणाला देखील लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे, तर शिवेसना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार राहिले आहेत. वीस तारखेपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, या अधिवेसनापूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट 

पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला काँग्रेसचा मोठा पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, आधी आमदार आणि नंतर खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. आता या खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in