• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी

May 29, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आपण रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आपण सरकारला दहा महिन्यांचा वेळ दिला,  29 मे रोजी दहा महिने पूर्ण होत आहेत, सरकारला अजून किती वेळ द्यायचा? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे, त्यामुळे आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाहीये, परंतु जर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय होत असेल तर कठोर भूमिका घ्यावी लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे.  मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विखे पाटलांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.  या बैठकीनंतर ते उद्या दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. इथे विखे पाटील यांची विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.  या बैठकीनंतर विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान त्यापूर्वी गुरुवारी दुपारी राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद देखील पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की मी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे, आणि या सगळ्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेप्रमाणे कारखान्यांच्या गोडाऊनवर धाडी घाला! साखर महागताच कुणी केली मागणी?
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 अन्न आस्थापनांवर FDAची कारवाई; तपासणीत नेमकं काय काय आढळलं?
  • Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
  • पर्यटकांची पहिली पसंती! पश्चिम चंपारणच्या ‘या’ वन्यजीव स्थळाला रोज 1,000 सैलानींची भेट
  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in