• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोज जरांगेंच्या उपोषणावर सरकारचं लक्ष, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी चर्चा करताना काय घडलं? मंत्री भुजबळांनी सगळं सांगितलं

September 11, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा-कुणबी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या 14 दिवसांपासून जरांगे उपोषणावर बसले आहेत. जरांगे उद्या मुंबईला उपोषण करणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर सरकारचं लक्ष आहे. याच मनोज जरांगे पाटील यांनी घाणेरड्या भाषेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मंत्री भुजबळ म्हणाले, सरकार त्यांच्याकडे पाहत आहे. व्यवस्थेचे काम आहे. यंत्रणा लक्ष देतील योग्य अयोग्य काय आहे. लोकशाहीत अधिकार आहे. त्यांनी घोषणा केली, प्रत्यक्ष काय होतं, पाहावं लागेल. सोयी-गैरसोयी पाहाव्या लागतात. सर्व जण सांगून सांगून दमले आहेत. आता मी काय सांगणार. एक शिष्टमंडळ भेटायला जाणार होतं. त्यांनी नकार दिला. ते गेले नाहीत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घाणेरड्या भाषेतून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ती महिला नरवस झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावणकुळे, संजय शिरसाट यांना कोणत्या भाषेत बोलतात’.

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत भुजबळ म्हणाले, ‘सरळ मार्ग केला तर 100 किलोमीटर कमी लागेल. ट्राफिक वेगाने होणार आहे. सेमी हायस्पीड नाशिक पुरता नाही. उत्तर महाराष्ट्रात फायदा होईल. खुडदला अडचण होईल म्हणे. वेगवेगळे देशात मार्ग काढतोच आहे. काकोडकर विद्वान आहे. मोठे टनेल काढतो आहेच ना? भारत सरकारच्या प्रकल्पवार परिणाम होणार नाही. MSRDC ला रेल्वेने सहभागी करून घ्यावे. हे जर झालं तरच फायद्याचे आहे. 100 किलोमीटर वाढलं तर फायदा होणार आहे. मूळ कल्पना अमलात आणा. एका वर्षापूर्वी नकाशा दिला होता. मुख्यमंत्री यांनाही नकाशा दिला आहे. त्यात आम्ही यशस्वी ठरू’.

एकनाथ शिंदे यांच्या इंग्रजीतील भाषणावरही भुजबळांनी भाष्य केलं. ‘हेतू आरोप करण्यात अर्थ नाही. स्वागत झालं आणि भाषण उत्तम झालं. वेगवेगळे लोक जात असतात. मी सुद्धा परदेशात गेलो आहे. आपण काय चांगलं केलं हे सांगतो. एकनाथ शिंदे यांनी जे यश संपादन केलं, त्याबद्दल आनंद आहे’. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. अराजकीय संस्था आणि राजकारण भेसळ होता कामा नये. राजकीय पक्षाला मोर्चा काढायचा अधिकार आहे. पण अराजकीय संस्था असल्यावर त्यात राजकारण आणू नये’.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • QR कोड स्कॅन न करता करा पेमेंट! UPI चे नवीन टॅप अँड पे फीचर कसं काम करणार?
  • मनोज जरांगेंच्या उपोषणावर सरकारचं लक्ष, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी चर्चा करताना काय घडलं? मंत्री भुजबळांनी सगळं सांगितलं
  • भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक…
  • अखेर मनोज जरांगेंचं ठरलं, थेट मुंबईच गाठणार, उद्या सर्वात मोठी घोषणा; अंतरवलीत मोठ्या घडामोडी
  • मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध… बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in