• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

QR कोड स्कॅन न करता करा पेमेंट! UPI चे नवीन टॅप अँड पे फीचर कसं काम करणार?

September 11, 2026 by admin Leave a Comment


डिजिटल पेमेंटमध्ये भारताने मोठी भरारी घेतली आहे. UPI पेमेंटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत झटपट पेमेंट होत आहे. जेव्हा इंटरनेट स्लो होतो तेव्हा Google pay आणि Phonepe सारखे प्लॅटफॉर्म नांगी टाकतात. पण आता UPI चे नवीन फीचर ‘Tap & Pay’ मुळे ही अडचण सुद्धा दूर होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF 2026) मुंबईत आयोजित केले आहे. त्यात ‘UPI Tap & Pay’ आणि ‘MyUPI’ लाँच करण्यात आले आहे. युझर्सला या फीचरमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. इंटरनेटचा वेग कमी असला तरी त्यांचे पेमेंट अडकणार नाही.

कसे काम करणार UPI Tap & Pay?

या फीचरमुळे युझर्स विना क्यूआर (QR) कोड स्कॅन करता, युपीआय ॲप न उघडता पेमेंट करू शकतील. वाय-फाय डेबिट अथवा क्रेडिट कार्डप्रमाणचे हे फीचर काम करेल. हे कार्ड स्वाईप मशीनवर टॅप करताच पेमेंट होते. या नवीन फीचरमध्ये युझर्सला मोबाईलमधील NFC-इनेबल्ड स्मार्टफोन अनलॉक करावा लागेल. दुकानदाराच्या पॉईंट ऑफ सेल (PoS) मशीन वर स्मार्ट टॅगजवळ टॅप करताच पेमेंट होईल.

मर्चेंट मशीच्या इंटरनेटच्या मदतीने व्यवहार पूर्ण होईल. या फीचरमुळे युझर्सला आता Google Pay, PhonePe, Paytm वा इतर पेमेंट ॲप वारंवार उघडण्याची, लॉक क्रमांक टाकण्याची आणि क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज उरणार नाही. इंटरनेट कमी असणाऱ्या भागातही व्यवहार पूर्ण करता येत असल्याने हे फीचर महत्त्वाचे ठरणार आहे.

विना पिन 5000 रुपयांपर्यंत पेमेंट

NCPI ने छोट्या व्यवहारासाठी विना युपीआय पिनचा वापर करत 5,000 रुपयांच्या व्यवहाराला परवानगी दिलेली आहे. पण त्यापेक्षा अधिकच्या रक्कमेसाठी पिनचा वापर करावा लागतो. या नवीन फीचरमुळे युझर्सला दिलासा मिळाला आहे. अनेक भागात इंटरनेट स्लो असते. अशावेळी हा मोठा दिलासा मानल्या जात आहे. MyUPI हे एक AI-स्वयंचलित कस्टमर सपोर्ट आणि नियंत्रण प्लॅटफॉर्म आहे. यामुळे युपीआयवरील व्यवहाराची माहिती एकाच ठिकाणी मिळते. युझर्सचे कितीही बँक खाती असली तरी MyUPI मुळे त्याला सर्व युपीआय व्यवहारांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाहतेयस ना काजोल…; अजय देवगण-तब्बू यांच्यातील केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
  • भारताची ताकद वाढणार, पाकिस्तानचा थरकाप उडणार; पुतिन यांच्यासोबत कोणत्या शस्त्रासाठी डील होणार?
  • जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता…
  • चमत्कार की योगायोग? हनुमान मंदिराजवळ अचानक वानरांची गर्दी; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
  • नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in