• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंदिरात राडा! भाजप आमदाराच्या मुलीने पोलिसालाच कानफटवलं, CCTV व्हिडिओ आला समोर

August 25, 2026 by admin Leave a Comment


कर्नाटकात भाजप आमदाराच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एका महिला पोलीसालाच कानफटवलं होतं. आमदाराच्या मुलीच्या कृत्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. महिला पोलिसाच्या कानाखाली दिल्याने प्रसाशकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दोघांमध्ये मंदिरात बाचाबाचीदरम्यान ही घटना घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आज मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी आणि एका पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मंदिरातच शाब्दिक वाद झाला. दोघांचा शा‍ब्दिक वाद टोकाला गेल्यानंतर आमदाराच्या मुलीने थेट महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली. आमदाराची मुलगी ऐश्वर्याने पोलीस अधिकारी सविता बी. पाटील यांच्या कानशि‍लात लगावली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्या दिवशी काय घडलं?

श्रीरंगपटनामध्ये आरती उक्काडा मंदिरात भीमा अमावस्याच्या कार्यक्रमात सायंकाळी 4.30 वाजता ही घटना घडली. पोलीस अधिकारी सविता बी. पाटील या मंदिरातील गर्दी नियंत्रित करत होत्या. त्याचवेळी ऐश्वर्या आणि काही इतर लोक मंदिरात पोहोचले. त्यांनी कोणत्याही रांगेशिवाय गर्भगृहात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस अधिकारी पाटील यांनी काही मिनिटं थांबण्यचा सल्ला दिला. त्यानंतर ऐश्वर्या यांनी आम्हाला का थांबवलं, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.

 

A confrontation involving the daughter of #Karnataka #BJP MLA B. #SureshGowda and a police officer at Aarathi Ukkada Temple in #Srirangapatna has drawn attention after CCTV footage of the incident emerged. The incident reportedly took place on August 12 amid heavy crowds on… pic.twitter.com/qikWOSw3Yq

— News9 (@News9Tweets) August 25, 2026

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दोघांनी जोरदार बाचाबाची होत असल्याचे दिसत आहे. यावेळी ऐश्वर्या या फोनचा वापर करताना दिसत आहेत. तसेच कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर त्या थेट महिला पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लगावते. त्यानंतर पोलीस अधिकारी सविता देखील आमदाराच्या मुलीला मारहाण करताना दिसत आहे. यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. सविता यांनी घटनेनंतर कॅथानहल्ली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. त्यानंतर ऐश्वर्या यांच्या विरोधात विविध कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, इचा पोहोचवणे, हेतूपूर्वक अपमान करणे आणि इतर संबंधित आरोपाचा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?
  • नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in