• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंदिरात एकाच देवतेच्या दोन मुर्ती ठेवताय…, वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ शुभ आहे की अशुभ?

June 9, 2026 by admin Leave a Comment


लोक सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी देवतांच्या सुंदर मूर्ती आणि चित्रे आणतात आणि त्या मूर्ती किंवा चित्रांची त्यांच्या मंदिरांमध्ये पूजेसाठी स्थापना करतात. पण देवतांच्या मुर्ती मंदिरात कशा स्थापन करायच्या यासाठी देखील नियम आहेत. भक्तीभावापोटी, लोक एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्तींची स्थापना करतात. यामुळे व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो आणि जीवनात विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. सांगायचं झालं तर, सनातन धर्मात मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे. घरातील मंदिर हे शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे आणि पवित्र केंद्र आहे. तिथे दररोज पूजा केल्याने भक्ताच्या मनात असीम शांती लाभते आणि त्याच्या जीवनात आनंद येतो.

घरात शांती आणि आनंदाचा अभाव: वास्तुशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या मूर्तीची पूजा केली जाते, तेव्हा तिच्या सभोवताली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर मंदिरात एकाच देवतेच्या दोन मूर्ती असतील, तर त्यांच्या ऊर्जेमध्ये संघर्ष होऊ शकतो. यामुळे घरातील सलोखा आणि शांतता भंग पावते.

एकाग्रता आणि ध्यानातील अडथळे: रोजच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या पूजेचा मुख्य उद्देश एकाच देवतेवर आपले लक्ष केंद्रित करणे हा आहे. जेव्हा एकाच देवतेच्या दोन मूर्ती असतात, तेव्हा पूजेदरम्यान भक्ताचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे त्यांना पूर्ण आध्यात्मिक लाभ किंवा मानसिक शांती मिळू शकत नाही.

संभाव्य वास्तुदोष: मंदिरात एकापेक्षा जास्त शिवलिंग किंवा गणपतीच्या मूर्ती ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. यामुळे आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक वाद होऊ शकतात.

आर्थिक नुकसानीचा धोका: मंदिरात एकाच देवतेच्या दोन मूर्ती एकमेकांसमोर ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. मूर्तींमधून बाहेर पडणारी ऊर्जा एकमेकांशी टक्कर देते, ज्यामुळे घराच्या समृद्धीमध्ये अडथळा येतो आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agrawal Case: खळबळजनक अपडेट! लग्नासाठी राजेशाही थाट ठेवणाऱ्या केतनची होणाऱ्या पत्नीने का केली हत्या? कारण तरी काय?
  • मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
  • केतन अग्रवाल प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक खुलासा, होणारी पत्नीच निघाली दगाबाज, तब्बल 8 जणांवर..
  • Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिसवरील टाईम ओव्हर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटीवर धडकणार, कधी आणि कुठे येणार पाहता?
  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in